Sanjay Raut : ''...म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली का..?''

Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई कुणालाही पळवता येणार नाही...
PM Narendra Modi, Sanjay Raut,Eknath Shinde
PM Narendra Modi, Sanjay Raut,Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी समृध्दी महामार्गासह विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मात्र, एम्सच्या उद्घाटनप्रसंगी मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. ही थाप राजकीय वर्तुळात चर्चांचा विषय ठरत आहे. मात्र,यावरुनच ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणी अगोदरच संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, शिवसेना आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. कोणत्या तरी एकाच बाजूने निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव असेल, मात्र आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता डोळ्यांत प्राण आणून या निर्णयाची वाट पाहत आहे. धनुष्याबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील. बाकी गट वगैरे काही आहेत, त्यांच्याविषयी राज्यातील जनता आणि न्यायालयही निर्णय घेईल.

PM Narendra Modi, Sanjay Raut,Eknath Shinde
Nitesh Rane News: 'माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला तरच निधी..' ; राणेंची गावकऱ्यांना धमकी

पंतप्रधान मोदी यांनी नागपूर दौर्यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप दिली. ती थाप तुम्ही जो खंजीर आमच्या पाठीत खुपसला त्याबद्दल होती का? असा सवालही आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे अशी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली आहे. 'आम्हाला असं वाटलं होतं की, महाराष्ट्राचा अपमान करणारी व्यक्ती या व्यासपीठावर असताना मी आणि तुम्ही इथे कसे बसू शकतो? असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांना म्हणतील. मात्र पंतप्रधानांनी तर मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ही थाप यासाठीच मारली असेल की पंतप्रधान म्हणाले असतील, शाब्बास! बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली,' 

PM Narendra Modi, Sanjay Raut,Eknath Shinde
Big Breaking : Anil Deshmukh यांचा कारागृहातील मुक्काम वाढला.. ; सीबीआयची उच्च न्यायालयात धाव

मुख्यमंत्र्यांचं बाळासाहेबांवरचं ते प्रेम म्हणजे केवळ ढोंग...

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाल्याचं बघायला मिळालं, पण हे सर्व ढोंग आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मात्र तिथेही बाळासाहेबांचा सन्मान राखला जाईल, असे वर्तन कोणी केले नाही. यावेळी जे बॅनर लावण्यात आले होते, त्यावर चौथ्या क्रमांकावर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com