Devendra Fadanvis-Cm Uddhav Thackeray
Devendra Fadanvis-Cm Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Fadanvis : हे सरकार पाण्याचे शत्रू, त्यांना मालपाणी कमावण्यातच रस..

सरकारनामा ब्युरो

जालना : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाण्याचे शत्रू आहेत, त्यांना फक्त मालपाणी कमावण्यातच रस असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. (Jalna) जालन्यात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जल आक्रोश माोर्चानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

मराठवाड्याला दुष्काळमुक्तीकडे नेणाऱ्या आमच्या मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेचा या सरकारने मुडदा पाडल्याचा आरोप देखील फडणीवस यांनी केला. फडणवीस म्हणाले, जालनेकरांना सातत्याने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. (Bjp) या समस्येला वाचा फोडण्यासाठी आजचा जल आक्रोश मोर्चा आहे.

१२९ कोटी रुपये जालन्याच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आमच्या सरकारने दिले होते. पण अडीच वर्षानंतरही काम ठप्प आहे, महाविकास आघाडी सरकारचे सध्या एकच काम सुरू आहे, ते म्हणजे आमच्या सरकारच्या काळात आणलेल्या योजनांना स्थगिती देणे आणि स्थगिती न दिलेल्या उर्वरित योजना-कामांचे उदघाटन करणे.

मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याच्या अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. पण, महाविकास आघाडी सरकारने योजनेला निधी देणेच बंद करून टाकले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या योजनेचा या सरकारने मुडदा पाडला. जलयुक्त शिवार, शेततळे अशा सगळ्या योजना यांनी बंद केल्या. सूक्ष्मसिंचनाच्या योजनांचा खून केला, वैधानिक विकास मंडळ बंद करून टाकले. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार पाण्याचे शत्रू आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

त्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि त्यातच ते खुश आहेत. त्यांना फक्त मालपाणी कमाविण्यात रस आहे. टक्केवारी आणि वसुलीत मश्गुल असलेल्या या सरकारला जनतेच्या दु:खाशी काहीच घेणेदेणे नाही, अशी टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली. कुठल्याही परिस्थितीत सत्ता टिकविणे हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. आणि जिथे जिथे जनतेसाठी संघर्ष करण्याची वेळ येते तिथे भारतीय जनता पार्टी उभी राहते. राज्यात सध्या सरकार अस्तित्वात आहेच कुठे? असा सवाल करतांनाच मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवते, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT