Jal Akrosh March in jalna in presence of Devendra Fadanvis
Jal Akrosh March in jalna in presence of Devendra FadanvisSarkarnama

Bjp : आम्ही निधी दिला, तुम्ही अडीच वर्ष काय केले ? फडणवीसांचा सरकारला सवाल..

आता आमचे सरकार नाही, तीन पक्षाचे सरकार आहे, त्यांना पाणी कधी देणार याचे उत्तर द्यावे लागेल. (Raosaheb Danve)
Published on

जालना : मी मुख्यमंत्री असतांना जालन्याच्या पाणी योजनेसाठी १२९ कोटी रुपये दिले होते. आज आम्हाला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणून टीका करणाऱ्यांनी या पैशाचे काय केले ? याचा हिशोब द्या, अडीच वर्ष झाली, त्या पैशाचे काय झाले ? तुम्ही झोपला होतात का ? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

जालन्यात (Jalna) फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली. जे सरकार जनतेचे ऐकत नाही, त्यांना जावे लागते, असा इशारा देखील त्यांनी दिला. (Marathwada) प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, आम्ही मोर्चा काढला की सरकारला जाग येते, औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यावे लागले, घोषणा करावी लागली, त्यानंतर आता काही प्रमाणात कामाला सुरूवात झाली आहे. जालन्यात देखील हेच होईल.

जालनेकरांना एवढी वर्ष होऊन देखील पाणी का मिळत नाही ? आमचे सरकार असतांना आम्ही पाण्यासाठी १२९ कोटी रुपये दिले होते. अडीच वर्ष उलटून गेली, पण तो पैसा कुठे गेला हे कळायला मार्ग नाही, त्याचा हिशेब मागण्यासाठीच हा मोर्चा आहे. पंधरा दिवस लोकांना पाणी मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. जालन्याचे पाच टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचे पाणी प्रश्नासंदर्भात काही उत्तरदायित्तव नाही का? या प्रश्नावर फडणवीस चांगले भडकले.

Jal Akrosh March in jalna in presence of Devendra Fadanvis
Jalna : रावसाहेब दानवे म्हणाले, त्याने औरंगाबादचा `औरंगजेब` माझ्या मागे लावून दिला..

दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे जालन्याच्या पाण्यासाठी १२९ कोटी रुपये मिळाले होते. पण तुम्ही सरकारला त्यांनी अडीच वर्ष त्या निधीचे काय केले हे विचारणार नाही ? आम्हालाच प्रश्न विचारणार, ते अडीच वर्ष झोपले होते का ? असेही फडणवीस म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी देखील फडणवीस यांचीच री ओढली. ते म्हणाले, पाण्यासाठीच्या निधीचे काय केले? याचा जाब आम्ही विचारत आहोत.

जालनेकरांना पाणी मिळावे यासाठीच तो निधी फडणवीस मुख्यमंत्री असतांना दिला होता. पण नंतर जनतेने आम्हाला कौल दिलेला असतांना आमची मतं चोरीला गेली, चोरही सापडला. त्यामुळे आता आमचे सरकार नाही, तीन पक्षाचे सरकार आहे, त्यांना पाणी कधी देणार याचे उत्तर द्यावे लागेल, असे म्हणत दानवे यांनी जबादारी झटकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com