gangapur progaram  Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadanavis : फडणवीसांसमोरच खोक्यांची पळवापळवी; कुठे घडला प्रकार ?

Jagdish Pansare

Chhtrpati Sambhajinagar News : भाजपच्या कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कामगारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या कीटच्या खोक्यांची पळपळवी झाल्याने एकच गोंधळ उडाला. भाजपचे गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी अशा गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी बंब यांनी आरापूर येथे केली होती. याच कार्यक्रमात कामगार विभागाअंतर्गत सुरक्षा कीटचे वाटपही करण्यात येणार होते. यासाठी कीटचे बाॅक्स कार्यक्रमस्थळी आणण्यात आले होते. उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन झाल्यावर फडणवीसांचे भाषण सुरू असताना मागच्या बाजूला ठेवलेल्या कामगार कीटचे खोके ठेवण्यात आले होते.

कार्यक्रम बराच लांबल्यामुळे महिला आणि कामगारांनी थेट स्वतःच्या हातानेच कीटचे खोके घेऊन कार्यक्रमस्थळावरून पळ काढला. हे कीट घेऊन जाण्यासाठी गर्दी होऊन बराच गोंधळ उडाला. समोर फडणवीसांचे भाषण सुरू होते आणि मागे कीट घेण्यासाठी कामगार आणि महिलांनी अक्षरशः धुडगूस घातल्याचे चित्र होते. दरम्यान, या गर्दीला आवरताना बंब यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कीट घेऊन लोक निघून जात असल्यामुळे मागील खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या.

याआधी प्रशांत बंब यांच्याच गंगापूर येथील मोदी @90 कार्यक्रमातही पत्र्याच्या पेट्या घेऊन जाण्यासाठी अशाच उड्या पडल्या होत्या. गेल्यावेळी पेट्यांसाठी, तर आता खोक्यासांठी झालेली रेटारेटी यामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधी पेट्या, आता खोक्यांच्या पळवापळवीचा प्रकार

यानिमित्ताने गेल्यावेळी झालेल्या पेट्यांची पळवापळवी आणि त्यातून कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मारहाण याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी गंगापूरमध्ये मोदी@90 या कार्यक्रमालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर होते. आता दुसऱ्यांदा आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांच्या कार्यक्रमात आधी पेट्या आणि आता खोक्यांच्या पळवापळवीचा प्रकार घडला.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT