Sharad Pawar-Jayant Patil-Gavhane Sarkarnama
मराठवाडा

फडणवीस तर स्टेजवरचे अॅक्टर, राणे, विखेच भाजप चालवतात..

मुंडे-महाजन यांच्या काळातील भाजप आता राहिली नाही. बहुजनांना आता इथे जागाच नाही, खडसेंनी पक्ष सोडला, तावडे, बावनकुळे यांची तिकीटं कापली गेली. ( Ncp Maharashtra)

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याशी माझी राजकीय मैत्री होती, त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो आणि काम केले. (Late Gopinath Munde) पण आता ती भाजप राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे स्टेजवरचे अॅक्टर आहेत, पण भाजप पक्ष राणे, विखे हेच चालवतात, असा घणाघात राष्ट्रवादीत (Ncp) प्रवेश केलेले परभणीतील (Marathwada) भाजपचे नेते विजय गव्हाणे यांनी केला.

शाहू, फुले आंबडेकरांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवणारा नेता या महाराष्ट्रात कुणी असेल तर ते नेते म्हणजे शरद पवार हेच आहेत. माझी ही घरवापसी असल्याचे विजय गव्हाणे यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील भाजपचे नेते विजय गव्हणे यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी विजय गव्हाणे यांनी भाजपमधील आपला राजकीय प्रवास आणि सध्या त्या पक्षात होत असलेली घुसमट या विषयी भाष्य केले. गव्हाणे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने माझी घरवापसी झाली आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याशी माझी राजकीय मैत्री होती म्हणून मी भाजपमध्ये गेलो होतो. वीस वर्ष तिथे काम केले, पण मुंडे यांच्या निधनानंतर मी दिल्लीत पुन्हा गेलो नाही.

मुंडे-महाजन यांच्या काळातील भाजप आता राहिली नाही. बहुजनांना आता इथे जागाच नाही, खडसेंनी पक्ष सोडला, तावडे, बावणकुळे यांची तिकीटं कापली गेली. १७ पैकी १४ बहुजन संघटनमंत्र्यांना काढून तिथे उच्चवर्णीयांची नेमणूक करण्यात आली. पंकजा मुंडेंचे त्या पक्षात हाल सुरु आहेत. तरी ती तिथे का थांबली कळायला मार्ग नाही, मी तिला विनंती करणार आहे. पक्षाची राज्यातील सुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे सांगितले जाते, पण ते फक्त स्टेजवरचे कलाकार आहेत.

नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील हेच पक्ष चालवत आहेत. अमित शहा सिंधुदुर्गत गेले आणि राणे मंत्री झाले. काही दिवसांपुर्वी शहा शिर्डीत जाऊन आले, त्यामुळे विखे पाटील भाजप प्रदेशचे अध्यक्ष झाले तर नवल वाटायला नको, असेही गव्हाणे म्हणाले. माझ राजकारण वेगळ आहे, महाराष्ट्र आणि शाहू-फुले-

आंबेडकराचा महाराष्ट्र घडवावा, हे ध्येय घेऊन वाटचाल करायची आहे. आणि हे शक्य करणारा एकच नेता सध्या आहे आणि ते म्हणजे शरद पवार. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना पुन्हा या पक्षात आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT