Abdul sattar News  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती, सत्तारांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश..

Sillod : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १० जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याबाबत अर्ज सादर केला.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी व अपुरी माहिती दिल्याच्या गुन्ह्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विरोधात सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मिनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी २०४ अन्वये प्रोसेस इश्यु करण्याचे आदेश दिले. (Abdul Sattar News) याचिकाकर्ते महेश शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरदास यांनी ही माहिती दिली.

सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात २०२१ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हे आदेश दिले आहेत. (Shivsena) याचिकेत अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांचे नोटरी एस. के. ढाकरे यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने ढाकरे यांच्याविरोधातील दावा खारिज केला आहे.

प्रकरणात डॉ. हरिदास स्वत: युक्तीवाद करत आहेत. याचिकेनुसार अब्दुल सत्तार यांनी सन २०१४ व २०१९ सिल्लोड व सोयगाव (Marathwada) विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या शेतजमीन, व्यापार संकुल, निवासी इमारत याविषयी तसेच आपल्या शिक्षणाच्या संदर्भात खोटी, अपुरी माहिती दिली व आवश्यक ती माहिती लपवली आहे.

त्यावर खोटे प्रतिज्ञापत्र तयार करणे, २६ क्रमांकाचा अर्ज सादर करताना त्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे माहिती न भरता रकाने रिकामे सोडणे या गुन्ह्याबाबत याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१च्या कलम १२५ अ नुसार प्रोसेस इश्यु करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात जो अहवाल सादर केला तो समाधानकारक नसल्याने न्यायालयाने एक सविस्तर आदेश पारित करत, पुन्हा सखोल चौकशी करुन,आरोपाबाबत मुद्देसुद आणि स्पष्ट अहवाल ६० दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १० जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याबाबत अर्ज सादर केला. मात्र न्यायालयाने तो नामंजूर केला व सत्तार यांच्याविरुध्द प्रोसेस जारी केले आहे, अशी माहिती महेश शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरदास यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT