पुरात अडकलेल्या वृध्द शेतकऱ्याची बचाव पथकासोबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट सहभाग घेत यशस्वी सुटका केली.
या धाडसी कृतीमुळे दानवे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पूरस्थितीत शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी सज्ज असल्याचे दिसून आले.
Shivsena UBT : मराठवाड्यात पुराने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्याच्या कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात अतिवृष्टी ढगफुटी असे चित्र पाहायला मिळाले. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मराठवाड्यातील जनता सरकारकडे करत असताना संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांचे शिवसैनिक मैदानात उतरल्याचे दिसून आले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी छातीभर पुराच्या पाण्यात स्वतः उतरत घरात अडकून पडलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढल्याचे महाराष्ट्राने पाहिले. त्यांच्या या धाडसाबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुकही केले. उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी आपल्या निधड्या छातीच्या खासदाराची पाठ थोपटत 'हाच खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक' असे म्हटले होते.
मराठवाड्यात पावसाचा जोर काही ओसरताना दिसत नाहीये. त्यातच हवामान खात्याने पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात हडस पिंपळगाव येथे पुराच्या पाण्यामुळे शेत मळ्यात अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सुटका शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. बचाव पथकासोबत पाण्यात उतरत त्यांनी गणपत त्रंबक निघोटे या शेतकऱ्याला सुखरूप सुरक्षित स्थळी आणले.
छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा कमी पाऊस असला तरी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांचे पाणी गावात घुसल्याने घरे पाण्यात गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील गणपत त्रंबक निघोटे हे शेत मळ्यात अडकल्याची माहिती अंबादास दानवे यांना स्थानिक शिवसैनिकांनी दिली. त्यानंतर काही वेळातच अंबादास दानवे बचाव पथकाला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले.
शेत मळ्यात पुराच्या पाण्यातून जावे लागणार असल्यामुळे बोटीतून दानवे आणि बचाव पथकातील काही कर्मचाऱ्यांनी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या गणपत निघोटे यांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली. सुरक्षित स्थळी आणल्यानंतर निघोटे यांच्या मुलाने अंबादास दानवे आणि बचाव पथकाचे हात जोडून आभार व्यक्त केले. पुरातून आपली सुखरूप सुटका झाल्याचे समाधान आणि आनंद निघोटे यांच्या चेहऱ्यावरही दिसत होते.
प्र.१. वृध्द शेतकरी कुठे अडकले होते?
उ. ते पूरग्रस्त भागात अडकले होते, जिथे पाण्याचा वेग जास्त होता.
प्र.२. अंबादास दानवे यांनी काय केले?
उ. त्यांनी स्वतः बचाव पथकासोबत जाऊन शेतकऱ्याची सुटका केली.
प्र.३. शेतकरी सुरक्षित आहेत का?
उ. होय, शेतकऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
प्र.४. या कृतीवर समाजाची प्रतिक्रिया काय आहे?
उ. लोकांनी दानवे यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे.
प्र.५. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत?
उ. प्रशासन व बचाव पथके सतत काम करत असून, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.