Vijay Wadettiwar sarkarnama
मराठवाडा

Farmer Suicide News : जमीन गहाण ठेवूनही कर्ज मिळाले नाही, शेतकऱ्याची आत्महत्या; विजय वडेट्टीवार संतप्त

Vijay Wadettiwar News : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची चिठ्ठी वाचली तर डोळ्यात पाणी येते..पण या निर्दयी राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही!. शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकत आहे

Roshan More

Farmer Suicide News : छत्रपती संभाजीगनरमधील पिंपळखुटा गावातील शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. जमीन गहान ठेवून बँकेने कर्ज मंजुर केले मात्र चार महिने झाले तरी बँकेच्या मॅनेजरने खात्यात पैसेच टाकण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे खचलेल्या विठ्ठल यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्यांनी मुलगा, पत्नीची माफी मागितली आहे. या घटनेनंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दाभाडे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच बँकेसह सत्ताधाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

'आत्महत्या Farmer Suicide केलेल्या शेतकऱ्यांची चिठ्ठी वाचली तर डोळ्यात पाणी येते..पण या निर्दयी राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही! देशात उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्जमाफ होते. आणि इकडे शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकत आहे.

स्वतःची जमीन गहाण ठेवूनही कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला बँकेचे कर्मचारी आणि एजंट पैसे मागतात. राज्यकर्त्यांना शरमेने मान खाली घालायला लावतील अशा घटना आज महाराष्ट्रात घडत आहे.', असा संताप विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

'रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही...मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे! विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या मनातील हे अंतिम शब्द त्याने चिठ्ठीच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सांगितले.

आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला आणि बायकोला चिठ्ठी लिहून माफी मागितली.बँक आणि सत्ताधारी दोघांवर शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे', अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांना लुटले

सरकारने शेतकऱ्यांना लुटले आहे. हिऱ्यावर एक टक्का जीएसटी तर शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवर 14 टक्के जीएसटी लावला जात आहे. बियाणांच्या किमती वाढवल्या आहेत. हे सरकार टेंडर आणि टक्केवारीत व्यग्र आहे. आचारसंहितेच्या नावाखाली शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT