Bhujbal ON Awhad: भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण; आव्हाड म्हणाले, 'त्यामुळेच मी आपले नाव घेतले...'

Manusmriti in Maharashtra draft school, 30 May: माझा आव्हाडांना विरोध नाही, मनुस्मृतीला विरोध आहे, मनुस्मृतीला माझा कायमच विरोध असेल, मनुस्मृतीवरुन लक्ष हटविण्यासाठी आव्हाडांवर आरोप केले जात आहे, असे भुजबळ म्हणाले.
Manusmriti in Maharashtra draft school
Manusmriti in Maharashtra draft schoolSarkarnama

Mumbai: शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात काल (बुधवारी) महाड (Mahad) येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी आव्हाडांच्या हातून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद फाडला गेला. त्यावरून आता विरोधक आव्हाडांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आव्हाडांच्या विरोधात विरोधकांनी राज्यभर रान उठवले असून आंदोलनं सुरु आहेत.

अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ याप्रकरणी आव्हाडांची (Jitendra Awhad)पाठराखण केली आहे आहे. आव्हाड हे महाविकास आघाडीत असल्याने विरोधकांनी त्यांच्याविरोधात रान उठवलं आहे. माझा आव्हाडांना विरोध नाही, मनुस्मृतीला विरोध आहे, मनुस्मृतीला माझा कायमच विरोध असेल, मनुस्मृतीवरुन लक्ष हटविण्यासाठी आव्हाडांवर आरोप केले जात आहे, असे भुजबळ म्हणाले. आव्हाडांनी माफीही मागितली आहे, त्यानंतरही विरोधक आंदोलन करीत आहेत, असे ते म्हणाले.

Manusmriti in Maharashtra draft school
Eknath Shinde news: फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या रडारवर अगरवाल कुटुंब; बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरवा...

काल (बुधवारी) महाडमधील चवदार तळं येथे आव्हाडांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली. हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आले आहे. आव्हाडांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात नाशिक, मुंबई, ठाण्यासह राज्यभर शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यभरात आव्हाडांच्या विरोधात आंदोलन

राज्यभरातून आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारून धिंड काढण्यात आली.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भिवंडी शहरात भाजपा शहराध्यक्ष अँड.हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहर कार्यालयासमोर आव्हाडांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

आंदोलनात आमदार महेश चौगुले,माजी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. धुळे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com