Sunil Kendrekar News Sarkarnama
मराठवाडा

Farmers Report News : अखेर केंद्रेकरांच्या शेतकरी अहवालावर सरकारची फुली..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सादर केलेल्या अहवालावर अखेर राज्य सरकारने फुली मारली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपयायोजना सुचवणाऱ्या अनेक शिफारशी या अहवालातून करण्यात आल्या होत्या. (Farmers Report News) तेलंगणा पॅटर्नचा प्रभाव या अहवालावर असल्याची टीका तसेच महाराष्ट्रा सारख्या मोठ्या राज्यात शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये मदत देणे शक्य नसल्याचे मत देखील व्यक्त केले जात होते.

त्यामुळे केंद्रेकरांचा अहवाल सरकार स्वीकारणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर विधान सभेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या अहवाला संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात हा अहवाल स्वीकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. (Monsoon Session) स्वेच्छानिवृत्ती घेण्याआधी म्हणेजच २० जून रोजी केंद्रेकरांनी मराठवाड्यातील १० लाख शेतकऱ्यांच्या (Farmers) सर्वेक्षणातून केलेला अहवाल २० जून रोजी सरकारकडे सादर केला होता.

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा अहवाल समोर आल्याने यावर सत्ताधारी मंत्री, आमदारांनी टीका देखील केली होती. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी तर केंद्रेकर यांच्यावर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. (Marathwada) त्यामुळे या अहवालाच्या बाबतीत सरकारचा दृष्टीकोन समोर आला होता. केंद्रकर यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व इतर दिले जाणारे अनुदान बंद करून पेरणी हंगामाच्या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी १० हजार रुपयांची मदत करण्याची शिफारस केली होती.

राज्यातील १ कोटी ५३ लाख शेतकरी कुटुंबाची संख्या पाहता हा खर्च ४० हजार कोटीपर्यंत अपेक्षित होता. यावर राज्य सरकारच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेतील आपल्या लेखी उत्तरात तेलंगणा राज्याप्रमाणे एकरी १० हजारांची मदत महाराष्ट्रात देता येणार नाही, असे स्पष्ट केले. केंद्रेकरांचा हा अहवालच त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीला कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. सरकारने त्यांच्या अहवाल नाकारल्यावर त्याला पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT