Uddhav Thackeray On UCC ACT :
Uddhav Thackeray On UCC ACT : Sarkarnama

Uddhav Thackeray Interview : '...तर असा समान नागरी कायदा होऊ शकत नाही' ; उद्धव ठाकरेंचे रोखठोक मत!

Uddhav Thackeray On UCC ACT : "समान नागरी कायद्याचा अर्थ कुणाच्या लग्नापुरता ठेवायला आणणार असाल तर तो भाग वेगळा."
Published on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज (ता.२६) प्रसिद्ध करण्यात आला. या मुलाखतीत ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. समान नागरी कायद्यावरही ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray On UCC ACT :
Complaint filed Against Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटलांना दाखवा, ११०० रुपये बक्षीस मिळवा ; पोलीस ठाण्यात तक्रार

"आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला जात आहे, तो म्हणजे समान नागरी कायदा," असा राऊतांनी उल्लेख करताच ठाकरे म्हणाले, "देशातील लोकांनाही हाच प्रश्न पडला आहे की, समान नागरी कायदा म्हणजे काय? या कायद्यावर आपण नंतर बोलणारच आहोत. यावर शिवसेनाप्रमुखांनी आपली भूमिका परखडपणे मांडलेली आहे. समान नागरी कायदा करणार असाल तर पुन्हा तेच सांगतो की, कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून दाखवा. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा. तिकडे काहीच करत नाही आहात आणि समान नागरी कायद्याचा अर्थ कुणाच्या लग्नापुरता ठेवायला आणणार असाल तर तो भाग वेगळा."

ठाकरे पुढे म्हणाले, "कायद्यापुढे सगळे समान असले पाहिजेत. तुमच्यातल्या भ्रष्टाचाऱ्यांनादेखील शिक्षा झालीच पाहिजे. मला वाटतं हाच सामान नागरी कायद्याचा अर्थ जनतेला अपेक्षित आहे. दुसऱ्या पक्षात असला तर तो व्याभिचारी-भ्रष्टाचारी आणि त्यांच्याकडे असला तर तो संत झाला, अशा प्रकारचा समान नागरी कायदा होऊ शकत नाही," अशी रोखठोक भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

Uddhav Thackeray On UCC ACT :
Shivsena Disqualification Case : ठाकरे गटाची अस्वस्थता वाढणार; शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार?

राष्ट्रवादीने काय खुपसलं?

शिवसेना फोडण्याचं समर्थन करताना पाठित खंजीर खुपसला अस म्हणणारे आता राष्ट्रवादीने असं काय खुपसलं होतं की, तुम्ही राष्ट्रवादीही फोडली? शिवसेना फोडून ४० आमदार तिकडे घेतल्यानंतरही, सरकारमध्ये पुरेपुर संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी फोडण्याची गरज का भासली? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या चार पाच दिवसाआधी राष्ट्रवादीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपाचे काय झाले? त्या घोट्याळ्यातील पैशांचे काय झाले? कशासाठी ही फोडाफोडी केली? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com