Man Attack on NCP Leader
Man Attack on NCP Leader  Sarkarnama
मराठवाडा

Attack on NCP Leader: घरात घुसून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; वाचा काय आहे प्रकरण

सरकारनामा ब्यूरो

Osmanabad News: काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना अद्याप ताजी असताना आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

उस्मानाबादच्या राष्ट्रवादीच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत हातावर वार झेलल्यामुळे त्या बचावल्या आहेत. मात्र यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सांयकाळी एका अज्ञात व्यक्तीने मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरात प्रवेश केला. त्याने कपड्याने चेहरा झाकला होता. हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकूने वार करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रसंगावधान राखत पाटील यांनी तो वार हातावर झेलला. पाटील यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या घरातील लोक पाटील यांच्या घराकडे धावली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. पण त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात आपण तक्रार केली होती.

या रागातून जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांचा हल्ल्यामागे हात असू शकतो, असा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे

महिला बचत गटाच्या पोषण आहार वाटपाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी केलेल्या तक्रारींमुळे महिला आणि बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निपाणीकर हे अडचणीत आले होते.

त्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवून आणला असावा, असा दाट संशय मनीषा पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणात कुणाला अटक केली की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT