Pankaja Munde on Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde on Maratha Reservation: '...तोपर्यंत फेटा बांधणार नाही'; पंकजा मुंडेंचा एल्गार

सरकारनामा ब्यूरो

बीड : "जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीड येथील सभेत बोलताना त्यांनी हा एल्गार केला आहे. पण त्यांच्या या घोषणेमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणासाठी 'मराठा अस्त्र' उपसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, " राजेंद्र म्हस्के मला बोलले ताई फेटा बांधा मी म्हणाले नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळतनाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं त्यावेळी मी गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही, असं सांगितलं होतं. पण ते आरक्षण वाचलं आणि ते परत आता कोर्टात अडकलं " त्यांच्या या वक्तव्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलले आहेत.

ज्या लोकांना आम्ही शब्द दिला, आम्ही धनगर समाजाचे प्रश्न मांडले, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, तरुणांचे, बेरोजगारांचे, महिलांचे प्रश्न मिटवू, त्यांना काय तोंड दाखवायचे, जोपर्यंत त्यांना दिलेले शब्द पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत फेटा घालण्याची माझी मानसिकता नाही. आम्हाला वैभवाची कमी नव्हती, पण पायाखालचे काटेही गोड वाटतात कारण त्यावर तुमच्या प्रेमाचं आवारण आहे. अशा भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या. (Beed Politics)

२०१९ ला आपल्यासोबत धोका झाला. सर्वसमावेशक चेहरा म्हणून लोक माझ्याकडे बघत आहेत. पण २०२४ हे इतिहास घडवणारं वर्ष असेल. पण आता आपल्याला दूधाने तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे, अशी कडवट टीका पंकजा मुंडेंनी यावेळी केली. (Maharashtra Politics)

दरम्यान, "आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झडकत नाही. मराठा समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा राज्य सरकार प्रयत्न सरकार करत आहे. आरक्षण दिलचं पाहिजे पण सध्या त्याचा भावनिक मुद्दा करून काहीच साध्य होणार नाही." अशी प्रतिक्रियी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT