Pankaja Munde On Fadnavis: फडणवीसांच्या बीड दौऱ्यावेळी तीनदा पंकजा मुंडे का अनुपस्थित होत्या? त्यांनीच केला मोठा खुलासा

Beed BJP : देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता
Devendra Fadnavis and Pankaja Munde
Devendra Fadnavis and Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने बीडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने फडणवीस आणि पंकजा मुंडे एका मंचावर येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे तीन वेळेस बीड दौऱ्यावर आले होते. या तीनही वेळेला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis and Pankaja Munde
Thackeray Group Morcha: आदित्य ठाकरेंच्या मोर्च्याला भाजप देणार सडेतोड उत्तर...

याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. याबरोबरच काही दिवसांपूर्वी तीनही वेळा झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी आपण अनुपस्थित का होतो? यावरही प्रतिक्रिया दिली आहे. "देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आले त्यावेळी त्या तीनही कार्यक्रमाला मी अपेक्षितच नव्हते", असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "त्या कार्यक्रमाला मी अपेक्षितच नव्हते. आजच्या कार्यक्रमाला मला स्वत: दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नीने (ज्योती मेटे) यांनी फोन केला आहे, त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार आहे", असं त्या म्हणाल्या. तसेच विनायक मेटे यांच्याबाबतच्या काही आठवणीही यावेळी त्यांनी सांगितल्या.

Devendra Fadnavis and Pankaja Munde
Cabinet Expansion : अखेर ठरलं ; शिंदे गटातील दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात ; शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास भेट

"विनायक मेटे यांच्या परिवाराने कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे. माझ्याच जिल्ह्यातील एका नेत्याच्या परिवाराने कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणं हा सस्कृतीचा भाग आहे", असं त्या म्हणाल्या. तसेच "मी (पंकजा मुंडे) आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येणं मोठी गोष्ट नाही", असंही त्या म्हणाल्या.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com