Beed Political News : राज्यात लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व मतदारसंघात ठिकठिकाणी पोलिस पथके तैनात असून पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. अशात बीडमधील केजमध्ये चक्क दोन कोटी रुपयांचे चंदन पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड Beed पोलिसांनी केजमध्ये चंदन तस्करीची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल दोन कोटींचे चंदन जप्त केले आहे. या चंदनचोरी प्रकणात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केजचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्या नगरसेवकाचे बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार, बजरंग सोनवणे यांच्या प्रचारातील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे सोनवणेंच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बालाजी जाधव यांच्यावर यापूर्वी बर्दापूर आणि अंबाजोगाई पोलिस ठाण्यात असेच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीत बालाजी जाधव हे शरद पवार Sharad Pawar गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या प्रचारात सक्रिय आहेत. सोनवणे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. गुन्हा दाखल होताच सोनवणेंचा प्रचार करतानाचे जाधव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. परिणामी या प्रकरणाची बीडमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे अशी थेट लढत होत आहे. मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. दरम्यान सोमवारी (ता. 6) सोनवणेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा होणार होती. मात्र पवारांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. यावर सोनवणेंनी तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या पायावर विजय आणून ठेवतो, अशी पावरांना भावनीक साद घातली आहे. त्यातच जाधव यांच्यावर चंदनचोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सोनवणेंची Bajrang Sonwane अडचण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.