Jitendra Awahd News : मुख्यमंत्री शिंदेंमुळे राजकारणाचं वाटोळे; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

Eknath Shinde And Thane : आम्ही विद्यार्थी असल्यापासून बरोबर वाढलो आहोत. तो कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाही
Eknath Shinde, Jitendra Awahd
Eknath Shinde, Jitendra AwahdSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहे. आरोप - प्रत्यांरोपांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही नेते जुनी उणीदुणी काढून विरोधी गटातील नेत्यांना धारेवर धरण्याची संधी सोडत नाहीत. शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाणे जिल्हा काय आहे, हे समजावून सांगितल्याचा दावा केला. तसेच्या त्यांच्यामुळेच राजकारणाचे वाटोळे झाले, असा घणाघातही आव्हांडांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड Jitendta Awhad म्हणाले, आम्ही विद्यार्थी असल्यापासून बरोबर वाढलो आहोत. तो कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाही, असा गंभीर आरोपही आव्हाडांनी शिंदेंवर केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याला मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेते आता काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना मी बनवले. त्यांना काही माहिती होत का? ठाण्यात त्यांना मी फिरवले. तेव्हा त्यांना समजले की ठाणे काय आहे ते. हे एकनाथ शिंदेंनाही माहीत आहे, असा दावाही आव्हाडांनी केला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांनी नारायण राणेंसोबतच शिवसेना सोडायचा निर्णय घेतल्याचाही गौप्यस्फोट केला. मात्र त्यांना जाऊ न देण्यात पुढाकार घेतल्याचेही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केले.

Eknath Shinde, Jitendra Awahd
Baramati Political News : मडकं फोडलं अन् रान पेटलं; बारामतीत नेमकं काय घडलं?

आव्हाड म्हणाले, एकदा शिंदेंनी हे राणेंसोबतच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उद्धव ठाकरेंचा Uddhav Thackeray चांगला कार्यकर्ता जातोय म्हटल्यावर त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंनी मात्र नाराजीतून शिंदे जातायत तर जाऊदे काही किंमत द्यायची नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावर विचार केला तर सोडून गेल्यानंतर राणेंची ताकद वाढणार होती, हे माहीत होते. मात्र आपण शिंदेंना थांबवलं पाहिजे, असे ठरवले. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे जाऊन उद्धव ठाकरेंना लावून घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांनी Sharad Pawar उद्धव ठाकरेंना सांगितले, की एकनाथ शिंदे हे चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांना जाऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारेंसोबत एकनाथ शिंदेंना घेऊन 'क्षणभर विश्रांती'ला गेलो. तेथे त्यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितली आणि त्यांना पुन्हा शिवसेनेत घ्यायला लावले, असा दाव्या केल्यानंतर आव्हाडांनी, हे आमच्या हाताने घडलेले सर्वात मोठे पाप आहे, अशी खंतही व्यक्त केली. राजकारणात अशी बांडगुळे तयार झाल्यानेच राजकारणाचे वाटोळे झाले आहे. असा घणाघातही केला.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Jitendra Awahd
Bajrang Sonwane : साहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! बजरंग सोनवणेंची भावनिक साद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com