Fire in cotton Factory
Fire in cotton Factory  Sarkarnama
मराठवाडा

जयदत्त क्षीरसागर यांच्या सूतगिरणीला आग; लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक

सरकारनामा ब्युरो

बीड ः शिवसेना नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीडच्या ईट येथील सहकारी सूतगिरणीला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून पहाटे ही प्रकार उघडकीस आला.

आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती असून अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बीड तालुक्यातील ईट येथे गजानन सहकारी सुतगीरणी आहे. या सुतगीरणीच्या मालाला परदेशातून मोठी मागणी आहे.

या सुतगीरणीला मध्यरात्री उशिरा अचानक आग लागली. ही आग सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर बीड व परळी येथील अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे सुतगिरणीत असलेल्या मोठ-मोठ्या मशिनरी, सुत आदी लाखों रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती सुतगीरणीचे प्रमुख लेखाधिकारी विनोद गाडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT