मोदींनी आमच्या दोन अटी पूर्ण कराव्यात, आम्ही इंधनावरचा व्हॅट कमी करतो...

या अटींची पुर्तता झाली तर सरकार आजचं व्हॅट कमी करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Nawab Malik & Narendra Modi
Nawab Malik & Narendra ModiSarkarnama

मुंबई : केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील (Petrol-diesel) अबकारी कर कमी केल्यानंतर देशातील भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार असलेल्या तब्बल १७ राज्यांनी आपला व्हॅट कमी केला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आपला व्हॅट कधी कमी करणार असा सवाल विचारला जात आहे. मात्र आता हा कर कधी कमी होणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी खुलासा केला आहे. तसेच हा व्हॅट कमी करायचा असल्यास त्यांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) २ अटी घातल्या आहेत. या अटींची पुर्तता झाली तर महाराष्ट्र सरकार आजचं व्हॅट कमी करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवाब मलिक म्हणाले, देशात पोटनिवडणूकांचे निकाल आले. जनतेने देशात आता भाजप हरावो आंदोनल सुरु केले आहे, आता तेलाचे दर कमी होत आहे, त्यामुळे हे आंदोलन देशात सुरु ठेवायला हवे आहे, हे आता जनतेला समजले आहे. भाजपशासित राज्य कर कपात करुन इंधनाचे दर कमी करत आहेत, कारण केंद्र सरकार या राज्यांना थेट पैसे पाठवते आहे. बिगर भाजप राज्यांना ना वेळेवर जीएसटीचे (GST) पैसे दिले जाते, ना एनडीआरएफची नुकसान भरपाई. आमच्यासोबत पुर्णतः सावत्रपणा दाखवला जात आहे. त्यामुळे आपली आर्थिक घडी संभाळण्यासाठी ही सरकारं जे काही निर्णय आहेत ते घेत आहेत, असे हि त्यांनी स्पष्ट केले.

Nawab Malik & Narendra Modi
नवाब मलिक अभ्यासू; महाविकास आघाडी यांच्या पाठीशी आहे!

त्यामुळेच मलिक म्हणाले आम्ही मागणी करतो की, जनहित म्हणून केंद्राने जो काही २२ लाख कोटींचा कर गोळा केला आहे, तो राज्यांचा हिस्सा समजून त्यांना द्यावा, तर तो जे म्हणतील त्यापेक्षा जास्त कर आम्ही कमी करु. किंवा केंद्राला आणखी एक उपाय सुचवू इच्छितो, २०१४ मध्ये युपीएचे सरकार असताना जेवढा अबकारी कर होता तेवढा पुन्हा लागू करावा आम्ही ही लगेचचं २०१४ मध्ये जे आमचे व्हॅटचे धोरण होते ते लागू करु, अशा अटी मलिक यांनी पंतप्रधान मोदींसमोर ठेवल्या आहेत.

Nawab Malik & Narendra Modi
भाजपशासित राज्यांची तत्परता; पेट्रोल १२ आणि डिझेल १७ रुपयांनी स्वस्त

नारायण राणेंवर प्रहार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावरही मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सातत्याने सांगत राहिले की हे सरकार पडणार, टिकणार नाही. आधी २ महिने, ६ महिने, १ वर्ष टिकले. कारण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिले नाहीत. केंद्रीय यंत्रणांना आमच्यापैकी कोणीही घाबरलेले नाही. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला. आता‌ त्यांना काही बक्षिसी मिळाली म्हणून ते‌ काही बोलत आहे. पण हे सरकार पुर्ण ५ वर्ष टिकेल आणि २५ वर्ष‌ हेच सरकार सत्तेत राहिल, कोणी काळजी‌ करु नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com