Shivsena Leader Ambadas Danve Criticise BJP-CM Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Crime News: दोन दिवसांत पाच खून; उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं फडणवीसांना दाखवला आरसा; म्हणाले, 'गृहमंत्र्यांनी...'

Shivsena On Devendra Fadnavis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तीन दिवसांत पाच खून झाल्याच्या घटनेकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधत राज्यात पोलीस दल अस्तित्वात आहे की नाही? असा सवाल केला आहे. नांदेडमध्ये 3 दिवसांत 5 खून! राज्याच्या गृहमंत्र्यांना निवडणुकीच्या राजकारणातून वेळ मिळत असेल तर त्यांनी नांदेडच्या रस्त्यांवर पडणारे रक्ताचे सडे एकदा पहावेत.

Jagdish Pansare

Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा एका तरुणाचा खून झाला. गेल्या 48 तासात नांदेडमधील गँगवारमधून पाच हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, चाकू हल्ले होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे नांदेडमधील घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातून उमटू लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तीन दिवसात पाच खून झाल्याच्या घटनेकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधत राज्यात पोलीस दल अस्तित्वात आहे की नाही? असा सवाल केला आहे. नांदेडमध्ये 3 दिवसांत 5 खून! राज्याच्या गृहमंत्र्यांना निवडणुकीच्या राजकारणातून वेळ मिळत असेल तर त्यांनी नांदेडच्या रस्त्यांवर पडणारे रक्ताचे सडे एकदा पहावेत.

रस्त्यांवर असे लोक मारले जात असतील तर नांदेडमध्ये पोलीस दल अस्तित्वात आहे का, हा सवाल उभा राहतो. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही उलट गुंडांना सत्तेचा वरदहस्त लाभलाय का? असा सवाल उभा राहिला आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्यावर ते राज्याचे सर्वात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका केली आहे.

नांदेडमध्ये गेल्या 48 तासात पाच खून झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरातील डीमार्टजवळ गँगवॉरची घटना घडली. यातून दोन्ही टोळ्यांमधील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना शहरात पुन्हा दोन जणांचा खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीत रंजितसिंग तबेलेवाले या तरुणाचा खून झाला.

त्याच्यावर दोन जणांनी तलवारीने वार केले. यानंतर आज सकाळी सहा वाजता शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षे तरुणाचा खून करण्यात आला. भर रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेने सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर राजकीय वातावरणही तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT