Kate-Khaire

 

Sarkarnama

मराठवाडा

चंद्रकांत खैरेंवर आरोप करत माजी जिल्हाप्रमुखाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी काटे या नगरसेवक होत्या, त्याच प्रभागातून त्यांनी यावेळी मुलासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. (Shivsena Leader Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

चाकूर ः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे मराठवाड्यातील शिवसेनेची वाताहात करत आहेत, असा आरोप करत लातूरचे (Latur) माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. (Shivsena) या संदर्भात आपण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असल्याचेही काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काटे हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख म्हणून काम केले असून ९ वर्षे ते लातूर जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरपंचायतीमध्ये दोन नगरसेवक विजयी झालेले आहेत.

पक्षात त्यांनी विविध आंदोलने केली असून खुर्दळी येथील शेतकऱ्यांना तलावातील जमिनीचा मावेजा मिळवून देणे, लातूर - नांदेड रस्त्यावर अनाधिकृतपणे चालत असलेला टोलनाका उध्वस्त केला. आंदोलना दरम्यान त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता. नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी काटे या नगरसेवक होत्या, त्याच प्रभागातून त्यांनी यावेळी मुलासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.

परंतू महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख यांना विश्वासात न घेता फक्त दोन जागा शिवसेनेला दिल्या. यामुळे काटे यांचा मुलगा मल्हारी काटे यांनी त्याच प्रभागातून अपक्ष निवडणुक लढवली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे चाकूर येथे आले असता त्यांनी काटे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले.

खैरे यांच्यामुळे मराठवाड्यात पक्षाची वाताहत झाली असून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप देखील काटे यांनी यावेळी केला. शिवसैनिकांना संपविण्याचा ते प्रयत्न करीत असल्यामुळे आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे काटे यांनी सांगितले. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून अपक्ष म्हणून मतदारसंघात काम करणार असल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT