EX Minister Bhaskarrao Patil Khatgaonkar Meet Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Bhaskar Patil Kahtgaonkar Meet Ajeet Pawar : भास्कर पाटील खतगावकर मंत्रालयात, आश्वासनांची अजित पवारांना करून दिली आठवण!

Former Maharashtra minister Bhaskar Patil Khatgaonkar visited Mantralaya and met Deputy Chief Minister Ajit Pawar. पडलेला गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी आपल्या भाषणात केली होती.

Jagdish Pansare

Nanded Political News : अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावंकर आणि त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांनी आपल्या समर्थकांसह 23 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खतगावकरांचा हा पक्षप्रेवशे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकर यांनी आपल्या भाषणात नांदेड जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांची जंत्रीच मांडली होती. यावर अजित पवार यांनीही आपल्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा 'वादा'केला होता.

आता दीड महिन्यानंतर भास्कर पाटील खतगावकर यांनी आज मुंबईत मंत्रालयात (Ajit Pawar) अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. सोबत सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व इतर पदाधिकारीही होते. नरसी येथे झालेल्या पक्षप्रेवश सोहळ्यात खतगावकर यांनी नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कॅनालची दुरूस्ती, बंद पडलेला गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी आपल्या भाषणात केली होती.

या सगळ्या मागण्या व रखडलेल्या कामांना लवकरच वेग दिला जाईल. यासाठी मुंबईत या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. तसेच मीनल खतगावकर यांना पक्षात त्यांच्या योग्यते प्रमाणे संधी दिली जाईल, असा शब्दही अजित पवार यांनी दिला होता. (Ncp) त्यानंतर आज खतगावकर यांनी अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली. नांदेड जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, कामांना वेग देण्यासाठी त्याची यादीच ते सोबत घेऊन आले होते.

अजित पवारांशी या सगळ्या प्रश्नांवर त्यांची चर्चा झाली. लवकरच या कामांमधील अडथळे दूर करून ते सोडवले जातील, असे यावेळी अजित पवारांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामं मंजूर करण्यासंदर्भात माजी मंत्री आणि दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रखडलेली विकासकामं मार्गी लावली जातील तसंच ती वेळेत पूर्ण होतील, अशी खात्री त्यांना दिल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यावर अजित पवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना शह देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या पक्षाता इकमिंग सुरू झाले आहे. काँग्रेसच्या चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे.

विशेषतः भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून अंकूश ठेवण्यात राष्ट्रवादीला यश मिळताना दिसत आहे. मेहुणे भास्कर पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता अशोक चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT