Senior Leader Bhaskar Patil Khatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

माजी मंत्री भास्कर पाटील खतगांवकरांचा भाजपला रामराम; पुन्हा काॅंग्रेस प्रवेशाची घोषणा

( Bhaskar Patil Khatgaongkar rejoin Congress) खतगांवकरांच्या जाण्याने जिल्ह्यात भाजपला खिंडार पडले आहे. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश व उमेदवारी देण्यास खतगावंकरांचा विरोध होता.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या धामधुमीतच भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री भास्कर पाटील खतगांवकर यांनी भाजपचा राजीनामा देत आपण काॅंग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खतगावकरांचे मन वळवण्यासाठी केलेले प्रयत्न व शिष्टाई निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला तेव्हापासूनच खतगांवकर नाराज असल्याचे दिसून आले होते. भाजपच्या प्रचार आणि नेत्यांच्या दौऱ्यापासून चार हात लांब राहत त्यांनी काॅंग्रेसमधील घरवापसीचे संकेत दिले होते. अखेर आज खतगावकर यांनी स्वतःच आपण भाजपचा राजीनामा देऊन काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

भास्कर पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे खतगावंकर हे भावजी आहेत. प्रत्येकी तीनवेळा आमदार, खासदार व राज्याचे मंत्री राहिलेले खतगांवकर ऐन पोटनिवडणुकीतच पक्ष सोडून जात असल्याने भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहे.

खतगांवकर यांच्या पक्ष सोडण्याने जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश व उमेदवारी देण्यास खतगावंकर यांचा विरोध होता. पण खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच जिल्ह्यातील बहुतांश निर्णय घेत असल्याने पक्षश्रेष्ठींनी खतगांवकर यांच्या विरोधाला फारसे जुमानले नाही.

शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला, खतगावकरांनी भाजपला रामराम केला आहे. या निमित्ताने भाजपमधील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. खतगावकर यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचीही भाजपला सोडचिठ्ठी देत खतगांवकरांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा दौऱ्यावर देवेन्द्र फडणवीस गेले होते यावेळी फडणवीस यांनी भास्करराव खतगावकर यांची भेट घेतली होती...दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली होती...या चर्चे नंतर देगलूर ची निवडणूक भाजप उमेदवार जिंकणार अशी चर्चा मतदार संघात होती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT