आंबेडकरांनी घेतला ओबीसी नेत्यांचा समाचार

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य व केंद्र सरकारवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama

अकोला : महाविकास आघाडी सरकाने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन केलं, या आंदोलनावरुन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य व केंद्र सरकारवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाअंतर्गत धम्म मेळाव्याला बोलत होते.

''गेल्या आठवड्यात शेतकरी समर्थनार्थ देशव्यापी बंदला महाविकास आघाडी सरकारने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी कायदे बनवण्याचे डोके कुणी दिले,'' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अधक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ओबीसींना उद्धस्त करण्याचा प्रयत्न सुरू असून, या मुद्दाची अभ्यासपूर्ण मांडणी करून लढ्यात उतरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आंबेडकरांनी राज्यातील ओबीसी नेत्यांचा समाचार घेतला. भारतीय बौद्ध महासभाने सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अन्य नेतेही उपस्थित होते.

Prakash Ambedkar
गडकरी-फडणवीसांच्या बैठकीत आखले जातायेत निवडणुकीचे डावपेच

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''मोदींना हे कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणी दिले? सन २००५-०६ मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील कृषी कायद्यातील मसुदे व केंद्राच्या कायद्यातील तरतुदीसारख्याच आहेत. त्यामुळे कृषी कायद्याच्या विरोधातील बंदला काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसने दिलेला पाठिंबा हा तोंडदेखलेपणा आहे.''

Prakash Ambedkar
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं चंद्रकांत पाटलांची केली 'चंपी'

''आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर आरोप करीत, मोदी म्हणजे हिटलरशाही ; ते मुस्कटदाबी कशी करतात, ही अभ्यापूर्ण मांडणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेते- कार्यकर्त्यांनी सर्वांगाने अभ्यास करणे, स्वत:कडील माहिती अद्यायावत ठेवणे, आवश्यक आहे. पुढील १० वर्षे ओबीसी लढ्यासाठी महत्त्वाचे आहेत. याची अभ्यासपूर्ण मांडणी करावी,'' असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

तडजोडीच्या आंदोलनाचा फायदा शेट्टी, खोतांना ; शेतकऱ्यांचे काय?

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty), भाजपचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्यांनी कारखान्यांना वठणीवर आणत जेवढी एफआरपी आहे तेवढा दर देण्यास भाग पाडले. याबदल्यात शेतकऱ्यांनीही त्याची जाण राखत शेट्टी यांना निर्विवादपणे खासदार केले. सदाभाऊ खोतही भाजपमधून का असेना पण मंत्रीही झाले. संघटनाच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसा शेट्टी आणि खोत यांनाही फायदा झाला आहे. आता मात्र, सर्वच संघटनांनी शेतकऱ्यांचा विचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे. कारण आंदोलन आता शेतकऱ्यांना परवडणार नसल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com