Shivajirao Pandit  Sarkarnama
मराठवाडा

Shivajirao Pandit Allegation On Govt : माजी मंत्री शिवाजीराव पंडितांचा सरकारवर गंभीर आरोप; ‘पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन...’

Datta Deshmukh

Beed News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या समाजातील महिला, युवती, युवक, शेतकरी, शेतमजूर यांच्यावर पोलिसांनी आश्रूधुर सोडून अमानुष केलेला लाठीचार्ज निंदनीय आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केली. (Former minister Shivajirao Pandit made serious allegations against government)

या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. २ सप्टेंबर) बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला आपला पाठिंबा असल्याचेही शिवाजीराव पंडित यांनी जाहिर केले.

माजी मंत्री पंडित म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शांततेत आंदोलन केले. मात्र, आरक्षणाचा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. लोकशाहीमध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी समाजाकडून होत असून प्रत्येक वेळी आंदोलन, उपोषण केले जात आहे.

अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास कार्यकर्ते बसले होते. उपोषण शांततेत सुरु होते. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील अनेक महिला, पुरुष, युवक, युवती, विद्यार्थी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि आश्रुधुर सोडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यात महिला, युवती गंभीर जखमी झाले. ही घटना अत्यंत निंदनीय आणि खेदजनक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या घटनेचा आपण जाहीर निषेध करत असून आजच्या बीड बंदला आपला पाठिंबा आहे, असेही शिवाजीराव पंडित यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, ८७ वर्षीय शिवाजीराव पंडित समाजाच्या आरक्षण प्रश्नावर कायम सक्रीय असतात. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT