Udayanraje Meet Maratha agitation
Udayanraje Meet Maratha agitationSarkarnama

Udayanraje Meet Maratha Agitation : अधिकाऱ्यांना निलंबित करा अन॒ लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी लावा; उदयनराजेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

Jalna incident news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी कालच माझी मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली.
Published on

Jalna News : जालन्यात मराठा समाज बांधवांवर लाठीहल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे यांनी केली. (Judicial inquiry into Jalanya stick attack : Udayanraje's demand)

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांवर आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा समाज बांधवावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १ सप्टेंबर) लाठीहल्ला करण्यात आला. त्या उपोषणकर्त्याची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. भेटीनंतर उदयनराजे बोलत होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

Udayanraje Meet Maratha agitation
Solapur Maratha Agitation : 'नैतिकता शिल्लक असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'; सोलापुरात मराठा समाज आक्रमक

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या समाज बांधवांवर शुक्रवारी (ता. २ सप्टेंबर) जालन्यात जो हल्ला झाला, त्याचा मी निषेध करतो. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठीहल्ला केला, त्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. जे लोक पोलिसांच्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी. तसेच, जालन्यात जो लाठीहल्ला झाला आहे, त्याची तातडीने न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.

Udayanraje Meet Maratha agitation
Beed Band : मराठा समाज आक्रमक; बीडमध्ये कडकडीत बंद, बीड-जालना एसटी सेवा बंद

राज्यातील प्रत्येक मराठा व्यक्तीच्या मनात हीच इच्छा आहे की, इतर जाती जमातींमधील लोकांना न्याय मिळत असेल, तर मग मराठा समाजाला न्याय का नाही. खरं तर हे फार वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होते. पण, का झालं नाही, हे मला माहिती नाही. ज्यावेळी कुठल्याही समाजावर अन्याय होतो, तेव्हा उद्रेक होणे स्वभाविक आहे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

Udayanraje Meet Maratha agitation
Jalna Maratha Andolan : ठिणगी पडली, आता वणवा पेटणार; जालन्यातील घटनेवरून कोल्हापूरमधील मराठा समाज आक्रमक

आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की, आरक्षणासंदर्भातील आपलं आंदोलन हे शांततेच्या माार्गाने चालू ठेवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी कालच माझी मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली. येत्या दोन तीन दिवसांत तुमच्या मागण्या त्यांच्या कानावर मी घालेन. तसेच, आंदोलनकर्त्यांची आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com