Dnyaneshwar Patil Panel
Dnyaneshwar Patil Panel Sarkarnama
मराठवाडा

Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

सरकारनामा ब्यूरो

परंडा (जि. उस्मानाबाद) : परंडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत (Election) माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकरी विकास पॕनेलने दणदणीत यश मिळविले. या निवडणुकीत माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote), माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखालील बाणगंगा शेतकरी विकास पॅनेलचा पराभव झाला. सर्वच्या सर्व १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. (Former MLA Dnyaneshwar Patil dominates Paranda Society)

या निवडणुकीसाठी रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी रविवारी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदान केंद्रावर दिवसभर तळ ठोकून होते. अखेर मतदारांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या पॅनेलच्या सर्वच्या सर्व १३ उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. युवा नेते रणजीत ज्ञानेश्वर पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी रणजीत पाटील म्हणाले की भूम-परंडा-वाशी या मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर असल्याचे बारा गावाची सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कौल दाखवून दिला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाणगंगा शेतकरी विकास पॅनल उभे केले होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पॅनल उभे केले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, पालकमंत्री तानाजी सावंत गटाने माघार घेतली होती. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे या दोघांनी सोसायटीची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सोसायटीसाठी निवडणूक होऊन मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम बी मोरे यांनी काम पाहिले.

ज्ञानेश्वर पाटील गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

अनिल शिंदे, (६९२) अशोक खैरे (७४२), कालिदास खैरे (७२२), खलील पठाण (६८७), अब्दुल पटेल(७०१), लक्ष्मण होरे (६८१), लक्ष्मण गरड (६९४) विनोद गावडे (६८१), गंगुबाई राजेश गायकवाड (७६०), झुंबरबाई मधुकर जाधव (७०२), मैनुद्दीन तुटके (७६०), नाना शिंदे (७६४), सुधाकर गायकवाड (७८४).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT