Harshvardhan Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav Hospitalised: हर्षवर्धन जाधवांना हृदयविकाराचा सौम्य झटका; दिल्लीत उपचार सुरू

Harshvardhan Jadhav Health News: हर्षवर्धन जाधवांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Delhi News: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला आहे. हर्षवर्धन जाधव हे सध्या दिल्लीत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असतांना त्यांना छातीत त्रास झाल्याचे जाणवले. त्यानंतर हर्षवर्धन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवी दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यावर उपचार सुरू असून सध्या हर्षवर्धन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी नुकताच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केलेला आहे.

हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या काही कामानिमित्त दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधवांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने तेथील एका रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT