Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Market Committee News : सभापती, उपसभापती निवडीत माजी आमदार प्रदीप नाईकांनी सगळ्यांनाच केले खूष ..

Marathwada Political News : प्रदीप नाईक यांनी किनवट, माहूर तालुक्यातील बाजार समितीच्या निवड प्रक्रियेत सोशल इंजिनियरींग केले.

Jagdish Pansare

Nanded Political News : (लक्ष्मीकांत मुळे) नांदेड, किनवट विधानसभा मतदारसंघातील माहुर किनवट, इस्लापूर या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी सोशल इंजिनिअरिंग साधत सर्व समाज घटकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. (Market Committee) किनवट, माहुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस-भाजपाच्या अभद्र युतीला दणका दिला होता.

प्रदीप नाईक यांच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळाला होता. किनवट बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी (ता दोन) पार पडली. (Nanded) सभापतीपदासाठी गजानन मुंडे तर उपसभापतीपदासाठी राहुल नाईक यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. (Marathwada) मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाताही जल्लोष यावेळी करण्यात आला नाही.

किनवट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा आमदार असुनही बाजार समितीच्या निवडणुकीत अपयश पदरी पडले. (Mahavikas Aghadi) या मतदार संघात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तिन्ही बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. किनवट बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने आघाडीचा सभापती व उपसभापती होणार हे निश्चित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदीप नाईक यांनी किनवट, माहूर तालुक्यातील बाजार समितीच्या निवड प्रक्रियेत सोशल इंजिनियरींग केले असून यामध्ये सर्व समावेशक व सर्व समाजाला सत्तेत न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. इस्लापूर बाजार समितीमध्ये मराठा समाजाचे शिवाजी घोगरे यांना सभापती पदी संधी दिली, तर माहुर येथे बेलदार ओड समाजाचे नेते दत्ताराम मोहिते यांना सभापती केले.

तर उपसभापती पदी अनिल रुणवाल या सोनार समाजातील व्यक्तीला स्थान दिले. तसेच किनवट बाजार समितीत वंजारी समाजाचे गजानन मुंडे व बंजारा समाजाचे राहुल नाईक यांना संधी दिली. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात झालेल्या बाजार समिती निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली होती ती भाजप आणि काॅंग्रेस पक्षाने केलेल्या युतीमुळे. परंतु मतदारांना ही राजकीय सोयीची युती आवडली नाही आणि त्यांनी या दोन्ही पक्षांना नाकारत जोरदार दणका दिला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT