Manoj Jarange News : अजित पवारांबद्दल असलेला रोष कमी करण्यासाठीच शिष्टमंडळात धनंजय मुंडेंची एन्ट्री ?

Marathwada Political News : राज्यात मराठा आरक्षणासारखा संवेदनशील मुद्दा आणि त्यावरून हिंसक आंदोलन सुरू असतानाही अजित पवार शांत कसे ?
Manoj Jarange News
Manoj Jarange NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज नववा दिवस. या नऊ दिवसांत संभाजीराजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती आणि राजकीय नेत्यांपैकी आमदार बच्चू कडू सोडले तर इतर कुणाला अंतरवालीत प्रवेश मिळाला नाही. (Manoj Jarange Patil News) राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदी केल्यानंतर जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी या, आरक्षण देणार की नाही? ते एकदाच सांगा, उगाच दुसरी वळवळ नको`, असे म्हणत सरकारला आणखी एकदा चर्चेची संधी दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange News
Maratha Reservation Protest : ...तर सरकारविरोधात 'काळी दिवाळी' साजरी करू; मराठा आंदोलकांचा इशारा!

दरम्यान, बीड, धाराशिव जिल्ह्यांत हिंसक आंदोलन झाले. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, नगर परिषदेचे कार्यालय, तर बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, राष्ट्रवादीचे कार्यालय आंदोलकांनी जाळले. (Jalna) तिकडे मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, राज्यातील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कुठेही दिसले नाहीत.

बारामतीसह राज्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध करत ताफा अडवण्याचे प्रकारही घडले. (Dhananjay Munde) मराठा समाजाचा रोष पाहता त्यांना नाशिक दौराही रद्द करावा लागला होता. त्यानंतर त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून ते घरीच विश्रांती घेत आहेत. राज्यात मराठा आरक्षणासारखा संवेदनशील मुद्दा आणि त्यावरून हिंसक आंदोलन सुरू असतानाही (Ajit Pawar) अजित पवार शांत कसे? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने तर मराठा आरक्षणाचा प्रश्न असला की अजित पवारांना डेंग्यू कसा होतो? अशी शंका उपस्थितीत केली होती.

अजित पवार परखडपणे आपली भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. मराठा आरक्षणावरही त्यांनी अनेकदा आपले मत मांडले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. अगदी त्यांच्या बारामतीमध्येही त्यांना विरोध झाला. यातून अजित पवार हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फारसे गंभीर नाहीत, असे चित्र निर्माण झाले. अगदी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बीड आणि त्यांच्या पक्षातील आमदाराचे घर जाळल्यानंतरही त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही.

दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घरावर हल्ला झाल्यानंतर आपण लवकरच पुराव्यानिशी या जाळपोळीमागे कोण होते हे समोर आणू, असे सांगत अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा बीड, धाराशिव व जिथे जिथे जाळपोळ, शासकीय, कार्यालये वाहनांचे नुकसान झाले तिथे आंदोलकांवर ३०७ कलम लावून गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली.

Manoj Jarange News
Ajit Pawar : दौंड शुगर; अजितदादांबाबत मराठा आंदोलकांचा मोठा निर्णय...

मुंडे हे अजित पवारांचे, तर चिवटे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू

त्यानंतर मनोज जरांगे यांनीही काही आरोप करत बीडमध्ये जाळपोळ करणारे तुमचेच म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच लोक होते, आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, तर मग आम्ही आहोत आणि तुम्ही, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने काल झालेल्या मराठा आरक्षणविषयी सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावाची माहिती देण्यासाठी एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवालीत दाखल झाले आहे.

यामध्ये कृषी तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. मुंडे हे अजित पवारांचे तर चिवटे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. धनंजय मुंडे यांचा शिष्टमंडळातील समावेश हा अजित पवारांची मराठा आरक्षणाविषयीची भूमिका जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने केल्याचे बोलले जाते.

Manoj Jarange News
Maratha Reservation : PM मोदी, अमित शहांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?; जरांगेंच्या प्रकृतीवरून राऊतांचा घणाघात

शिवाय बीड, माजलगावमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवरच (त्यात अजित पवार राष्ट्रवादी गटासह) गंभीर आरोप केले, त्यावरही भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी अजित पवारांनी मुंडे यांच्यावर सोपवल्याचे दिसते. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवर पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनीही अद्याप कुठलेच भाष्य केलेले नाही.

अशावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठीच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा म्हणावा लागेल. मराठा समाजामध्ये अजित पवार यांच्याबद्दल असलेला रोष, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे या आपल्या दूतामार्फत करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाते. आता धनंजय मुंडे यांचे प्रयत्न किती यशस्वी ठरतात हे जरांगे यांच्या पुढील भूमिकेनंतरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com