Bahsakar patil khatgaonkar Join NCP News Sarkarnama
मराठवाडा

Bhaskar Patil Khatgaonkar : ठरलं, अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर पाडव्याआधीच राष्ट्रवादीत जाणार!

Former Member of Parliament Bhaskar Patil Khatgawkar is set to join the Nationalist Congress Party (NCP), with Ajit Pawar scheduled to visit Nanded : अजित पवार काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी नांदेडमध्ये आले होते. या दौऱ्यातच त्यांनी भास्कर पाटील खतगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Jagdish Pansare

Nanded Political News : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांचा अखेर निर्णय पक्का झाला आहे. गुडीपाडव्याच्या आधीच खतगावकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार नायगाव-नरसी येथे येणार आहेत. तिथेच खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

अजित पवार यांचा नुकताच नांदेड दौरा झाला. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार आले होते. या दौऱ्यातच त्यांनी अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर (Bhaskar Patil) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दहा मिनिटांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत खतगावकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. आता या प्रवेशाचा मुहूर्तही ठरवण्यात आला आहे. 23 मार्चला नायगाव-नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे.

महिनाभरातच काँग्रेसचे दोन माजी आमदार, एका माजी खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याने नांदेड जिल्ह्यात अजित पवार यांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांच्यासोबतच भास्कर पाटील खतगावकरही गेले होते. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी मिळाली, विधानसभेला त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी मिळून त्या आमदारही झाल्या. खतगावकर यांचे मात्र राजकीय पुनर्वसन झालेच नाही.

विधानसभा निवडणुकीत नायगावमधून सुनेला उमेदवारी मिळवून देण्यासाठी भास्कर पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. पण त्यांचा हा प्रयोगही फसला, मीनल खतगावकर यांचा पराभव झाला. आता स्वतःसाठी नाही, पण सुनेला राजकारणात भक्कमपणे उभे करण्यासाठी भास्कर पाटील खतगावकर हे प्रयत्न करताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवून असलेल्या खतगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील एन्ट्री किती फायद्याची ठरते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

तीनवेळा खासदार, आमदार राहिलेले भास्कर पाटील खतगावकर हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात सुरू होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडमध्ये आभार यात्रेच्या निमित्ताने आले, तेव्हा ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. शिंदे हे खतगावकरांच्या घरी जाऊन चहापान घेणार, असल्याचीही माहिती होती. पण ही 'चाय पे चर्चा' आणि खतगावकर यांचा शिवसेना प्रवेशही हुकला. अखेर भास्कर पाटील खतगावकर यांनी आपल्या नव्या इनिंगसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे 23 मार्चला नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत नरसी येथे प्रवेश सोहळा पार पडणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ. मीनल खतगावकर, माजी उपमहापौर सरजीतसिंघ गील यांच्यासह खतगावकर यांचे शेकडो समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT