Pratap Patil Chikhlikar V/S Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा 'मोहरा' ठरतोय भारी! माजी आमदारांच्या प्रवेशाने चिखलीकरांची काॅलर टाईट

The competition for dominance between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar in Nanded heats up : काँग्रेसमधील चव्हाण विरोधक आणि भाजपमधील आपल्या समर्थकांना राष्ट्रवादीत आणत चिखलीकर यांनी जिल्ह्यात आपले राजकीय वजन वाढवले. राज्य पातळीवरही आपली काॅलर टाईट असल्याचे दाखवून दिले.
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded NCP News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार अशोक चव्हाण विरुद्ध आमदार प्रताप पाटील चिखलीकर असा राजकीय संघर्ष नवा नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा जवळपास सर्वच पक्षांचा अनुभव घेतलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांची सध्या चलती आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे झालेली कोंडी आणि पराभव पाहता चिखलीकरांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी मारली. उमेदवारी मिळवत विधानसभेत पुन्हा एन्ट्री केली.

दुसरीकडे भाजपाला अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडून असलेल्या अपेक्षा मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये. भोकर मतदारसंघातून कन्या श्रीजया चव्हाण, देगलूर-बिलोलीमधून जितेश अंतापूरकर विजयी झाल्याने चव्हाण यांचे वर्चस्व जिल्ह्यात कायम असल्याचे सांगितले जाते. परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यभरात मिळालेले यश जसे कोण्या एका पक्षाचे किंवा महायुतीतील नेत्याचे नाही, तसेच नांदेडमध्ये महायुतीला मिळालेले यश हे अशोक चव्हाणांमुळे मिळाले असे म्हणता येणार नाही. एकूणच काय? तर संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या स्पर्धेत तुर्तास तरी प्रताप पाटील चिखलीकर यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

भाजपामध्ये आपले बस्तान बसवू पाहणाऱ्या अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी (Pratap Patil Chikhlikar) चिखलीकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू केले होते. विधानसभेतील विजयाने या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले. अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील स्थानिक बड्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणत चिखलीकरांनी बाजी मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही चिखलीकरांच्या या कामगिरीवर खूष असल्याची चर्चा आहे.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
Ashok Chavan News : तेव्हा जमलं नाही ते अशोक चव्हाण आता करून दाखवणार! नांदेडमध्येच आयुक्तालय करण्यासाठी शक्ती पणाला..

अशोक चव्हाण यांच्यावर संधी मिळेल तेव्हा कुरघोडीचा चिखलीकरांचा प्रयत्न राहिला आहे. लोहा-कंधार मतदारसंघातून पुन्हा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर या प्रयत्नांना अधिकच पंख फुटले आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, हे ओळखून चिखलीकरांनी विधानसभेत वेगळा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाला अशोक चव्हाण कारणीभूत असल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील त्यांच्या प्रवेश योग्य ठरला.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
Pratap Patil Chikhlikar On Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकरही मैदानात, म्हणाले स्वबळाची खुमखुमी असेल तर..

चिखलीकर आमदार झाल्याने त्यांनी काँग्रेसमधील अशोक चव्हाणांच्या समर्थक आमदारांना पक्षात घेण्याचा धडाका लावला होता. काँग्रेसमधील चव्हाण विरोधक आणि भाजपमधील आपल्या समर्थकांना राष्ट्रवादीत आणत चिखलीकर यांनी जिल्ह्यात तर आपले राजकीय वजन वाढवलेच, पण राज्य पातळीवरही आपली काॅलर टाईट असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसलाही नांदेडमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी बड्या नेत्याची गरज होती ती चिखलीकरांच्या पक्षप्रवेशाने पूर्ण झाली. अजित पवार यांनी चिखलीकरांना फ्री हॅन्ड दिल्याचा फायदा पक्षाला होताना दिसतो आहे.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
Ajit Pawar : बीडचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवणार? अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात आपापल्या पक्षांच्या कार्यक्रमानिमित्त नांदेडचे दौरे केले. या दोन्ही पक्षांमध्ये अन्य पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांचा बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करवून घेत चव्हाण यांनी वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांचे ते काँग्रेसमध्ये असतानाचे समर्थक अविनाश घाटे, मोहन हंबर्डे या माजी आमदारांना राष्ट्रवादीत आणले.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
Jalna-Nanded Expressway News : अशोक चव्हाणांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे भवितव्य अंधारात!

आता अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या प्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. नांदेड दौऱ्यात अजित पवार खतगावकर यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांच्या बंद दाराआड चर्चा झाली होती. याशिवाय काँग्रेसच्या माजी जि.प.अध्यक्ष वैशाली चव्हाण यांच्यासह व्यंकटराव गोजेगावकर, शिवराज पाटील होटाळकर, स्वप्निल चव्हाण, बाळासाहेब रावणगावकर हे माजी जिल्हा परिषद सभापतीही राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत.

Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News
BJP Politics : माजी मुख्यमंत्र्यांनी सत्ता सोडून भाजपमध्ये प्रवेश केला; आता तेल गेले, तूप गेले...

याशिवाय लोहा-कंधार तसेच देगलूर, भोकर, नांदेड आदी तालुक्यांतील काँग्रेस व इतर पक्षांतील दोन हजारांहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते. चिखलीकरांची ही सुसाट निघालेली गाडी अशोक चव्हाण यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशोक चव्हाण समर्थक माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, दादाराव ढगे, शेकापचे माजी आमदार दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र अ‍ॅड.मुक्तेश्वर यांनीही चिखलीकरांवर विश्वास दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com