Pratap Patil Chikhlikar Join NCP Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

NCP Second Candidate list : हार मानना नामंजूर है...! लोकसभेला पराभूत, भाजपचे प्रतापराव आता 'घड्याळा'वर विधानसभा लढणार

Pratap Patil Chikhlikar Join NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 जणांचा समावेश आहे. तर या यादीतील भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवलेल्या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी चर्चेत आहे.

Jagdish Patil

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने (NCP) शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 जणांचा समावेश आहे. मात्र, या यादीत सर्वात जास्त चर्चेतली उमेदवारी आहे ती म्हणजे नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांची.

कारण त्यांनी नुकत्याच झालेल्या 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, लोकसभेला भाजपच्या (BJP) अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचाही समावेश होता. पण लोकसभा भाजपकडून लढवलेले चिखलीकरांनी विधानसभेसाठी थेट पक्षांतर केलं आहे.

शुक्रवारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांना पक्षाकडून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेला पराभूत झालेल्या चिखलीकरांनी अद्याप हार मानली नसून ते विधानसभेसाठी पुन्हा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

जरांगे फॅक्टरमुळे पराभव

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या पराभवाला, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा आणि मुस्लिम समाजांचा फॅक्टर शिवाय संविधान बदलाचा फेक नरेटिव्ह कारणीभूत ठरल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता ते विधानसभेला कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील 7 उमेदवार

निशिकांत पाटील - (इस्लामपूर)

संजयकाका पाटील - (तासगाव कवठे महांकाळ

सना मलिक - (अणुशक्ती नगर)

झिशान सिद्दीकी - (वांद्रे पूर्व)

सुनिल टिंगरे - (वडगाव शेरी)

ज्ञानेश्वर कटके - (शिरूर)

प्रताप पाटील चिखलीकर - (लोहा)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT