Pune Politics: महायुती-आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'या' मतदारसंघात दोन राष्ट्रवादी अन् दोन शिवसेनेमध्येच लढत रंगणार?

Hadapsar Assembly Constituency election:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार महादेव बाबर बंड करण्याच्या तयारीत आहेत.
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

विधानसभेसाठी महाविकास आघाडीने निवडणूक यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणी बंडाचं निशाण फडकलं आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार चेतन तुपे यांना मैदानात उतरवले आहे.

हडपसरमधून (Hadapsar Assembly election2024) प्रशांत जगताप यांना उमेदवारी देत शरद पवार यांनी चेतन तुपे यांच्यासमोर त्यांच्या राजकीय कट्टर स्पर्धकाला रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेली आहे.

प्रशांत जगताप यांना आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी नाराज झाले आहे. बाबर यांनी तिकीट मिळेल, अशी आशा बाबर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. बाबर यांनी प्रचारास सुरवातही केली होती. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने ते आज कोंढवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. शक्तीप्रदर्शन करीत ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
Ambernath Assembly Election: तीन टर्म आमदार असलेल्या किणीकरांचा विजयरथ स्वपक्षातूनच रोखला जाणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत शिवसेनेला सुटणारी जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला गेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. बाबर आणि भानगिरे यांनी अर्ज भरला तर हडपसरमध्ये दोन राष्ट्रवादी अन् दोन शिवसेनेमध्येच लढत होईल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com