Bjp Foundation Day News Sarkarnama
मराठवाडा

Bjp Foundation Day News : पक्ष सोडून गेलेल्या माजी अध्यक्षांना प्रदर्शनात स्थान नाही, तनवाणींचे पोस्टर हटवले..

Marathwada : शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर पुढे जात होते, तेव्हा त्यांना अचानक तनवाणी यांचे पोस्टर दिसले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : भाजपच्या स्थापनादिनानिमित्त भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शानातून जे पुर्वी पक्षात होते, पण कालांतराने दुसऱ्या पक्षात गेले अशा माजी अध्यक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे शिवसेनेतून (Bjp) भाजपमध्ये गेलेल्या आणि अडीच वर्ष शहर-जिल्हाध्यक्ष पद भुषवल्यानंतर परत घरवापसी केलेल्या किशनचंद तनवाणी यांचे पोस्टर प्रदर्शनातून ऐनवेळी हटवण्यात आले.

जिल्ह्यातील भाजप वाढीसाठी ज्या आजी-माजी जिल्ह्याध्यक्षांनी योगदान दिले, त्या सगळ्यांची माहिती दर्शवणारे पोस्टर चित्र प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. (Aurangabad) यात भाजपमध्ये शहर-जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि नंतर पुन्हा स्वगृही म्हणेजच ठाकरेंच्या शिवसेनेत परतलेल्या किशनचंद तनवाणी यांचा उल्लेख टाळण्यात आला. (Marathwada)

खरतरं त्यांच्या कार्यकाळाची माहिती दर्शवणारे पोस्टर फोटोसह प्रदर्शनात लावण्यात आले होते. परंतु उद्धाटनानंतर जेव्हा नेत्यांनी प्रदर्शनाला भेट देत तेथील चित्रांचे निरीक्षण केले तेव्हा तनवाणी यांचे पोस्टर पाहून सगळेच अवाक झाले. एक-एक पोस्टर न्याहाळत शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर पुढे जात होते, तेव्हा त्यांना अचानक तनवाणी यांचे पोस्टर दिसले.

त्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे निघून गेले. त्यानंतर सुत्र हलली आणि क्षणार्धात ते पोस्टत प्रदर्शनातून हटवण्यात आले. त्यामुळे पक्षासाठी योगदान असले तरी जे सोडून गेले, त्यांच्या आठवणी नको, असाच भाजपचा पावित्रा दिसला. दरम्यान, आधी लावलेले पोस्टर नंतर हटवले आणि फाडल्याची देखील चर्चा आहे.भाजप स्थापना दिनानिमित्त क्रांतीचौक येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या सर्व व्यक्तींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे.

त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामधून आज भारतीय जनता पार्टी सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली याचा देखील या प्रदर्शानामध्ये गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.जनसंघ ते भाजपापर्यंत प्रवास, पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष त्यांचा कार्यकाळ व त्यातील विविध घडामोडीचा प्रवास, पक्षाचा झालेला विस्तार हा चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT