Chhatrapati Sambhajinagar : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनोख्या पद्धतीच्या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या सर्व व्यक्तींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामधून आज भारतीय जनता पार्टी (Bjp) सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली याचा देखील या प्रदर्शानामध्ये गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. (Aurangabad) जनसंघ ते भाजपापर्यंत प्रवास, पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष त्यांचा कार्यकाळ व त्यातील विविध घडामोडीचा प्रवास, पक्षाचा झालेला विस्तार हा चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला होता.
तसेच छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यामध्ये भाजप रुजवण्यासाठी ज्या सन्माननीय जिल्हाध्यक्षांनी व ज्येष्ठ कार्यकर्ते, नेत्यांनी कष्ट घेतले, पक्ष तळागाळापर्यंत पोचवला त्या सर्व जिल्हाध्यक्षांचा समावेश देखील या चित्र प्रदर्शनात करण्यात आला होता. या शिवाय भाजप संघटन मंत्री यांच्या कार्याचा देखील गौरवपुर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याची माहिती देखील या माध्यमातून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार मंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर,भाजपा प्रदेश सचिव प्रवीण घुगे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत ,महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रदर्शनामुळे भारतीय जनता पार्टी व जनसंघाच्या कार्याचा इतिहास जनमानसापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हे चित्र प्रदर्शन खऱ्या अर्थाने लोकांसाठी उपयोगी ठरेल व जनतेला भाजपाचा राष्ट्रवादी विचार, सर्व अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केलेला त्याग नवीन येणाऱ्या पिढीला कळेल, या हेतून हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.