Aurangabad : जी-२० परिषदेच्या निमित्ताने येत्या २६ ते २८ दरम्यान दीडशे विदेशी तर ५० भारतीय पाहुणे औरंगाबाद शहरात येत आहेत. २५ फेब्रुवारीपासूनच त्यांचे आगमन शहरात होणार आहे. त्यामुळे या पाहुण्यासमोर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कुठल्याही प्रकारची निदर्शने, मोर्चा किंवा आंदोलन करू नये, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केले.
आपले प्रश्न आपण चर्चेने सोडवू पण विदेशी पाहुण्यांसमोर सगळं काही सुरळीत आणि चांगले आहे, असेच चित्र गेले पाहिजे असेही ते म्हणाले. (Collector) जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्या उपस्थीत झालेल्या बैठकीत सर्वांनीच सहकार्याचे आश्वासन दिले. (Aurangabad) शिंदे गटाचे जिल्हाध्यक्षांनी तर तीन दिवस दारूच्या दुकाना बंद ठेवा, अशी मागणी केली.
जी-२० परिषदेच्या निमित्ताने गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रशासन कामाला लागले आहे. शहरातील पर्यटनस्थळांवर विद्युतरोषणाई, शहरातील चौकाची, पुलांची रंगरंगोटी, रस्त्याची कामे अशी लग्नघाई गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आता प्रत्यक्षात जी-२० परिषद पंधरा दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्या आली होती.
डाॅ. कराड म्हणाले, ही परिषद आपल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत महत्वाची आहे. प्रशासन जोमाने कामाला लागले आहे, अनेक चांगली कामे शहरात झाली आहेत. आता नागरिकांनी, सामाजिक संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य करावे.
विदेशी पाहुणे शहरात येतील तेव्हा कुठेही अडथळा, वाहतुक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन कराड, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केले. तर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी या काळात तीन दिवस दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.