G-20 Summit News Sarkarnama
मराठवाडा

G-20 News : भारतीय आदरतिथ्याने भारावलेल्या विदेशी पाहुण्यांनी घेतला शहराचा निरोप..

Marathwada : महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच निरोप देखील देण्यात आला.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : जी-२० च्या अंतर्गत वुमन -20 या दोन दिवसीय परिषेदसाठी (G-20 Summit) आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधीनी आज शहराचा निरोप घेतला. काल २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या विमानाने एकूण १६ महिला प्रतिनिधीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. तर आज उर्वरित प्रतिनिधीनीं सकाळपासून वेगवेगळ्या वेळी प्रयाण केले.

जिल्हा प्रशासनाने जी-२० बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधींचा पाहुणचार व आदरातिथ्य केले होते. (Maharashtra) महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच निरोप देखील देण्यात आला. (Marathwada) संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात पुष्पहार, पैठणी, शेले देऊन केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या होत्या. हॉटेल रामामध्ये महिलाविषयक परिषदा व चर्चासत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, जोडीला चवदार पौष्टीक पदार्थाचा आस्वाद, याची अनुभूती देत प्रशासन तत्पर राहिले.

प्रत्येक शासकीय विभागाने दिलेली जबाबदारी सांभाळत पाहुण्याची काळजी घेतली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वात प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान यामध्ये राहिले.

विमानतळावर आगमन आणि पाहुण्यांचे निरोप सुरळीत व्हावे यासाठी विमानतळ प्रबंधक डी.जी.साळवे यांची टिम तसेच स्वागत समितीतील सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसिलदार ज्योती पवार, विक्रम राजपुत व महसुल प्रशासनाच्या टीमने परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना आज निरोप दिला. राज्य पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग यांच्या मार्फत जी-२० परिषदेसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे स्वागत करण्यात आले.

शहर व शहरालगत असलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे म्हणजेच वेरुळ लेणी, बिबी का मकबरा याठिकाणी पाहुण्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला. चैर्ली मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रॉन्सीस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन, यांनी काल प्रयाण केले.

तर आज सुशेन जान फर्ग्युसन, कांता सिंग, जयन मेहता, नीता इनामदार, स्वामीनाथन, वेरीना दि तिमारा, फराह अरब, इस्तानी सुरानो, ऍनी ॲन्जीलिया, क्रिस्तांन्ती, नरिनी बोल्हर, इशिता, कार्लो सोल्डाटीनी, स्टिफानो डी टरगीला, कॅर्थीना मिलर, इल्वीरा मारास्को, शेविम किया, मधुसेन लक्ष्मी व्ही.टी, जानाभी फोकन, केलसे हॅरिस, सुहाभी, निधी गुप्ता, पूर्वी ठक्कर, ज्यलियन रोझीन, आयेशा अख्तर यांच्यासह इतर महिला प्रतिनिधीनी आज शहराचा निरोप घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT