G-20 Conference News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

G-20 News : महिलांच्या आर्थिक सबलीकरणाची शिफारस करणार

Marathwada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, `महिला-प्रणीत विकास` हे आपले ध्येय ठरविण्यात आले.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : राजकारण, समाजकारणासह प्रत्येक क्षेत्रात महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. त्यासाठी महिला-२० अभ्यासगटामार्फत देशातील विविध शहरांत जाऊन चर्चा केल्या जात आहेत. महिलांचे सर्वांत आधी आर्थिक सबलीकरण महत्त्वाचे असून, त्या अनुषंगाने जून किंवा जुलै महिन्यात जी-२० परिषदेला (G-20) अभ्यासगटामार्फत अहवाल सादर केला जाईल, असे महिला जी-२० गटाच्या व संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी रविवारी (ता. २६) सांगितले.

पत्रकार परिषदेत डॉ. पुरेचा पुढे म्हणाल्या, की जी-२० समूहाच्या २०१५ मध्ये तुर्की येथील अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत, महिला-२० गट स्थापन करण्यात आला होता. (PM Modi) जी-२० नेत्यांच्या घोषणापत्रात, धोरणे आणि लैंगिक समानता व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यावर भर देण्यासाठी हा गट कार्यरत आहे. (Maharashtra) यंदा भारताने यंदा जी-२० अध्यक्षपदासोबतच महिला-२० चे देखील अध्यक्षपद स्वीकारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, `महिला-प्रणीत विकास` हे आपले ध्येय ठरविण्यात आले. महिलांसाठी प्रतिष्ठेने जीवन जगता यावे, असे वातावरण निर्माण करणे, जिथे महिलांना त्यांच्या व इतरांच्याही आयुष्यात बदल घडविता येतील, अशी समान संधी निर्माण करणे हा उद्देश आहे.

महिला-२० ची उद्योजक महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, असे पाच प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २७ व २८ पहिली बैठक आयोजित केली आहे.

१३-१४ एप्रिलला राजस्थानातील जयपूर येथे तर १५ व १६ जूनला तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे आणखी दोन आंतरराष्ट्रीय संमेलने होतील. त्यानंतर महिला-२० अभ्यासगट जी-२० परिषदेला आपला अहवाल सादर करील. देशातील अनेक शहरांत फिरताना महिलांचे अनेक प्रश्‍न मांडले जात आहेत. त्यातून एक बाब समोर येते की, सर्वांत आधी महिलांचे आर्थिक सबलीकरण झाले पाहिजे. त्यावर आधारित आमचा अहवाल असेल असे डॉ. पुरेचा यांनी सांगितले. यावेळी पीआयबीच्या अतिरिक्त संचालक स्मिता शर्मा यांची उपस्थिती होती.

महिला-२० परिषदेमध्ये विकसित आणि विकसनशील २० देश सहभागी झाले आहेत. यावर्षी नायजेरिया, बांगलादेशने सहभाग घेतला. महिला-२० परिषदेसाठी जर्मनी, स्पेन, रशिया, अमेरिका, युरोपियन संघ, सौदी अरेबिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका, जपान, नॉर्वे, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, बांगलादेश, नायजेरिया या देशातील शंभर व इतर महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरच या परिषदेत चर्चा केली जाणार असल्याचे मुख्य समन्वयक धारित्री पटनाईक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT