Devendra Fadanvis News : छत्रपती संभाजीनगर, धाराशीवची अधिसूचना आज किंवा उद्या..

Bjp : नामांतराचा जो निर्णय झालेला आहे तो संपुर्ण जिल्ह्यासाठीचा आहे.
Dcm Devendra Fadanvis News
Dcm Devendra Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामांतर केल्यानंतर आज किंवा उद्याच या संदर्भातील अधिसूचना महसूल विभागाकडून काढली जाईल. त्यांनतर एअरपोर्ट, रेल्वे व इतर विभागांना यांना देखील कळवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Dcm Devendra Fadanvis News
Chandrakant Khaire News : भाजपला गडकरींची अडचण, म्हणून त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न..

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव हे नामांतर फक्त शहर, तालुक्यापुरते नाही, तर संपुर्ण जिल्ह्यासाठी हा बदल असणार आहे. (Bjp) त्यामुळे कुणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, एखाद्या शहराचं, तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव बदललं की त्या संदर्भातील अधिसूचना महसूल विभागाकडून काढली जाते. त्यानंतर हा बदल प्रत्यक्षात उतरतो. आज किंवा उद्या महसूल विभागाकडून या दोन्ही शहरांच्या नावातील बदलाच्या अधिसूचना काढण्यात येणार आहेत.

त्यामुळे नामांतराचा जो निर्णय झालेला आहे तो संपुर्ण जिल्ह्यासाठीचा आहे. त्यामुळे फक्त शहर, तालुका असा विषय नाही. जे नाव बदलण्यात आले आहे, ते संपुर्ण जिल्ह्याचे बदलण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार आल्यानंतर पुर्ण करता आली, याचे आम्हाला समाधान असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com