Municipal Commissinoer G. Shrikant News Sarkarnama
मराठवाडा

G Srikanth Transfer News: असे नाही, तर तसे आले, पण 'लाडके' जी. श्रीकांत 'पुन्हा आले'; CMकडे लावलेल्या 'फिल्डिंग'नं 12 दिवसांतच 'बदली' फिरवली

Atul Save Sanjay Shirsat News: राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले आणि त्यात जी. श्रीकांत यांना जलजीवन मिशनच्या संचालक पदी पाठवण्यात आले. या बदलीला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी यासाठी महापौर, महापालिकेतील काही नगरसेवक, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांनी प्रयत्न केले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांची नुकतीच जलजीवन मिशनच्या संचालक पदी बदली झाली होती. तत्पूर्वी जेव्हा जेव्हा श्रीकांत यांच्या बदलीची चर्चा व्हायची तेव्हा पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांनी आम्ही त्यांना जाऊ देणार नाही, असा दावा केला होता. संभाजीनगरकरांसाठीची पाणी पुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत आयुक्तांची बदली होऊ देणार नाही, असे ठामपणे सगळे सांगत होते.

परंतु, राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले आणि त्यात जी. श्रीकांत यांना जलजीवन मिशनच्या संचालक पदी पाठवण्यात आले. या बदलीला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी यासाठी महापौर, महापालिकेतील काही नगरसेवक, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांनी प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न अपुरे ठरले आणि महापालिकेत नवे आयुक्त म्हणून अमोल येडगे रूजू झाले. राजकीय नेते आपली ताकद पणाला लावून जी. श्रीकांत यांच्या बदलीला स्थगिती मिळवतील, अशी सगळ्यांना अपेक्षा होती.

परंतु, अवघ्या बारा दिवसांत या बदलीमध्ये ट्विस्ट आला. आज जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश धडकले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात असताना श्रीकांत यांना बढती देऊन पुन्हा शहरात आणल्यामुळे मुंबईहून नेमकी सूत्रं कोणी हलवली? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

जी. श्रीकांत यांनी महापालिकेत चांगली कामगिरी करत दोन वर्षे अकरा महिने कारभार सांभाळला. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 3 मे 2023 ला महापालिकेचे प्रशासक म्हणून ते रूजू झाले होते. आपल्या कार्यकाळात स्मार्ट सिटीसह अनेक उल्लेखनीय कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

317 कोटी रुपयांचे रस्ते, शहराची पाणीपुरवठा योजना, गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे, महापालिकेची निवडणूक, 'आम्हाला खेळू द्या' अभियान, शहराचा नवीन विकास आराखडा अंतिम करणे, महापालिकेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणे, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 11 हजार 120 घरांचे भूमिपूजन, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करणे, अनुकंपा आणि लाड-पागे समितीनुसार नियुक्तीची सर्व प्रकरणे निकाली काढणे, महापालिकेतील नोकर भरती, खाम, सुखना नदीचे पुनरूज्जीवन, विकास आराखड्यातील रस्त्यांचे रुंदीकरण, अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली.

श्रेणी अवनत करून बदली

जी. श्रीकांत यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या जागी करण्यात आली आहे. यासाठी हे पद निवड श्रेणीत अवनत करून करण्यात आली आहे. नवीन पदाचा पदभार त्वरीत स्वीकारावा असे या बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT