Chandrakant Khaire-Ambadas Danve In Shivsena Bhavan News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve-Chandrakant Khaire : 'गणरायाने बुद्धी दिली', शिवसेना भवनात खैरे-दानवे एकत्र!

Chandrakant Khaire and Ambadas Danve came together at Shiv Sena Bhavan : अंबादास दानवे हे आपला कारभार त्यांच्या मातृभूभी प्रतिष्ठाण या संपर्क कार्यालयातून हाकत होते. तर चंद्रकांत खैरे यांनी मात्र शिवसेना भवन या पक्षाच्या अधिकृत कार्यालयातच संघटनात्मक बैठका, मेळावे घेतले.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक-एक पदाधिकारी जय महाराष्ट्र करत असताना पक्षातील दोन नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दोघे बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त औरंगपुऱ्यातील शिवसेना भवनात प्रथमच एकत्र आले. हे चित्र पाहून दोघांच्याही समर्थकांनी 'गणरायाने बुद्धी दिली', अशाच प्रतिक्रिया दिल्या असतील.

शिवसेनेत फूट पडली, लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पदरी अपयश आले. तरी जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे यांच्यातील कुरबुरी मात्र सुरूच होत्या. मातोश्रीवर आमच्यात वाद नाही असे सांगून बाहेर पडणारे हे दोघ जिल्ह्यात आल्यानंतर मात्र 'ये रे माझ्या मागल्या' प्रमाणे वागायचे. पक्षाला लागलेली गळतीही सुरूच आहे, अशावेळी खैरे-दानवे यांच्यात गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर एकत्र आले आहेत.

जिल्ह्यात अंबादास दानवे (Ambadas Danve) हे आपला कारभार क्रांतीचौकातील त्यांच्या मातृभूभी प्रतिष्ठाण या संपर्क कार्यालयातून हाकत होते. तर चंद्रकांत खैरे यांनी मात्र शिवसेना भवन या पक्षाच्या अधिकृत कार्यालयातच संघटनात्मक बैठका, मेळावे घेतले. खैरे कधी अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची पायरी चढले नाही, तर दानवे शिवसेना भवनात गेल्या कित्येक वर्षात फिरकले नाही. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा शिवसैनिकांची मातोश्रीवर बैठक घेतली तेव्हा त्यांनीही आधी खैरे-दानवे यांना एकत्र आणा, असे थेट सांगीतले होते.

नुकतेच निष्ठावंत शिवसंपर्क अभियानानिमित्त शहरात प्रशिक्षण शिबीर पार पडले. या मेळाव्यात पहिल्यांदा खैरे यांनी अंबादास दानवे चांगल काम करत असल्याचे म्हणाले. यावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. पण हा दोघांच्या समर्थकांना सुखःद धक्का होता. त्यानंतर आज गणपतीच्या आगमानासोबतच शिवसेना भवनात खैरे-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसून आले. दोघांनीही शिवसेना भवनात गणरायाची स्थापना आणि आरती केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर खैरे-दानवे यांच्यातील समेट पक्षासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.

खैरे-दानवे यांचे समर्थकही या निमित्ताने एकत्र आले. सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगप्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, आनंद तांदुळवाडीकर, श्रीरंग आमटे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, सुरेश गायके, सचिन खैरे, देवा त्रिभुवन, नारायण कानकाटे, विजय सूर्यवंशी, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, दुर्गा भाटी, विद्या अग्निहोत्री, सुनीता औताडे, भागूआक्का शिरसाठ, सुनीता सोनवणे, अरुणा भाटी, रेणुका जोशी, कांता गाढे, लता शंखपाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT