Sanjay Shirsat On Andhare, Patil News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Andhare, Patil News : गौतमी पाटील चांगली, अंधारे बदनामी करून पैसे कमावतात..

Marathwada : संसद भवनाच्या उद्धाटन कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार म्हणजे नसलेली एकजूट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : गौतमी पाटील ही पोटासाठी कला सादर करून पैसा कमावते, तिचे मी अभिनंदनच करेन. ती चांगली आहे, पण सुषमा अंधारे यांच्या सारख्या प्रवृत्ती मात्र इतरांना बदनाम करून पैसे कमावण्यात धन्यता मानतात, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केली. (Sanjay Shirsat On Andhare, Patil News) प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी विरोधकांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार, संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलेली टीका यावर देखील भाष्य केले.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, गौतमी पाटील, सुषमा अंधारे या दोघी कलाकार आहेत. गौतमी पाटील ही पोटासाठी कला सादर करते आणि पैसे कमावते, त्यात काही वावगे नाही. मी तिचे कौतुकच करतो. (Shivsena) पण अंधारे यांच्या सारख्या राजकारणातील काही कलाकार मात्र दुसऱ्यांची बदनामी करून पैसे कमावतात. त्यामुळे गौतमी पाटीलशी त्यांची तुलना होवू शकत नाही.

विरोधकांनी नव्या संसद भवनाच्या उद्धाटन कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार म्हणजे नसलेली एकजूट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. (Maharashtra) राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची कार्यक्रमाला जाण्याची इच्छा होती, पण त्यांना निमंत्रण व्हाॅट्सअपवर आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांना या कार्यक्रमला जाण्याची इच्छा होती, पण विरोधकांची एकजूट आहे हे दिसावे म्हणून ते गेले नाहीत.

संजय राऊत यांनी अग्रलेखात युध्द सुरू असा उल्लेख नव्या संसद भवनाच्या उद्धाटनावरून केला. राऊत यांना कुठे युद्धासारखी परिस्थिती दिसते आहे. चीन, पाकिस्तानशी आपले युद्ध सुरू आहे का? की देशात कुठे गृह युद्ध आहे. उगाच काहीतरी टीका करायची म्हणून ते करत असतात. मुळात ठाकरे कुटुंबात आणि शिवसेनेत भांडण लावून जो पक्ष राऊत यांनी फोडला, त्याला गृहयुद्ध म्हटले पाहिजे, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT