Marathwada : रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी बाजार समितीमध्ये हातमिळवणी करणे राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला चांगलेच महागात पडले. (Gangakhed APMC Election) पक्षाशी विश्वासघात करत गुट्टेंशी केलेली `गट्टी`, उघड झाल्यानंतर आता या तालुकाध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव साहेबराव भोसले यांना पक्षाने पदावरून काढले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली.
माधव यांचे वडील महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले होते. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने साहेबराव भोसले यांनाच महाविकास आघाडीकडून सभापती करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले होते. तरीही माधव भोसले व त्यांचे वडील साहेबराव भोसले यांनी (Ncp) राष्ट्रवादी काँग्रेस व महविकास आघाडीला धोका देत रासप पक्षाशी हात मिळवणी केली.
याबाबत गंगाखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाची दखल घेतली आहे. (Ratnakar Gutte) गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भोसले यांची गंगाखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टेंना मोठा धक्का बसला होता. १८ पैकी ११ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार वियजी झाले. तर रत्नाकर गुट्टे यांच्या गटाला फक्त ७ जांगावर विजय मिळवता आला होता. त्यानंतर झालेल्या बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत गुट्टे आणि राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची गट्टी जमल्यामुळे चित्र बदलले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.