Laxman Pawar Sarkarnama
मराठवाडा

Laxman Pawar : आमदार पवारांनी शब्द फिरवला; आधी माघार घेतली अन् आता वाढवले महायुतीचे टेन्शन

Gevrai Assembly Constituency: लक्ष्मण पवार यांनी कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते.

Datta Deshmukh

Beed News : पालकमंत्री, भाजप नेतृत्वावर टीका करत या निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत. पवार कुटुंबातील कोणीच निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केलेले आमदार लक्ष्मण पवार यांनी आपला शब्द फिरवला आहे. त्यांनी अखेर गेवराई मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उडी घेतली आहे.

2014 व 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकांत लक्ष्मण पवार भाजपच्या तिकीटावर लढले होते. दोन्ही निवडणुकांत त्यांच विजय झाला. महिन्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे व भाजप वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यशैलीवर टीका करत निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली होती.

पालकमंत्री मतदारसंघात अति हस्तक्षेप करत असून मनमानी करत आहेत व याबाबत नेतृत्वाला सांगून देखील यावर काहीच झाले नसल्याचा आरोप लक्ष्मण पवार यांनी केला होता. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे.

दरम्यान, त्यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे केला असून पक्षाने माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेली आहे. माजी मंत्री बदमराव पंडित यांना उमेदवारी मिळाली आहे.

कुणाला बसणार फटका?

विदयमान आमदारांच्या एन्ट्रीमुळे या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांनी उमदेवारी अर्ज दाखल करत विजयसिंह पंडित यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून कोण बाजी मारणार, याबबात उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT