Maharashtra Election: होय, कोणत्याही पक्षाला एकदाही सर्व 288 मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत!

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारसंघांची फेररचना झाली आणि 1978 मध्ये विधानसभेच्या जागा 270 वरून 288 झाल्या. त्यावेळेसपासून कोणत्याही पक्षाला सर्व 288 मतदारसंघांत उमेदवार देता आलेले नाहीत. काँग्रेसची एकहाती सत्ता येण्याच्या काळातही हे शक्य झाले नाही.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्ष जोमाने मैदानात उतरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढत होणार आहे. असे असले तरी अन्य पक्षही निकालात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

या राजकीय रणधुमाळीत कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवार निवडताना सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला या सर्व जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत.

राष्ट्रीय, प्रादेशिक राजकारणात प्रभावी असलेल्या पक्षांकडेही 288 उमेदवार देण्याची क्षमता राहिलेली नाही. युती, आघाड्यांच्या राजकारणामुळे पक्षांच्या विस्ताराला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तडजोड करावी लागत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी 3 प्रमुख पक्ष सामावलेले आहे. त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरही आपले उमेदवार देण्याची क्षमता कोणत्याही पक्षाकडे नाही, हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या 270 जागा होत्या. 1974 मध्ये मतदारसंघांची फेररचना करण्यात आली. त्यात 18 मतदारसंघ वाढले. विधानसभेच्या जागांची संख्या 270 वरून 288 झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली होती. त्यामुळे विधानसभेची सहावी निवडणूक 1977 ऐवजी 1978 मध्ये झाली. या निवडणुकीतही एकही पक्षाने सर्व 288 मतदारसंघांत उमेदवार उभे केले नव्हते.

1980 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने 286 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 186 जिंकल्या होत्या. अपवाद 1967 च्या निवडणुकीचा. त्यावेळी विधानसभेच्या 270 जागा होत्या आणि काँग्रेसने (Congress) सर्व जागा लढवत 203 ठिकाणी विजय मिळवला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या 1962 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसेने 264 जागा लढवत 215 जिंकल्या होत्या.

Maharashtra Politics
Congress Vs ShivsenaUBT: काँग्रेस-ठाकरे गटात विकोपाला गेलेला वाद महाविकास आघाडीच्या मुळावर उठणार?

पुढे 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसने 287 जागा लढवल्या आणि 161 जिंकल्या. 1990 मध्ये काँग्रेसने 276 जागा लढवून 141 जिंकल्या. त्यावेळी शिवसेनेने 183 आणि भाजपने (BJP) 104 जागा लढवल्या होत्या. या दोन्ही पक्षांना अनुक्रमे 52 आणि 42 जागा मिळाल्या होत्या. 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसने 286 जागा लढवल्या होत्या. काँग्रेसला त्या निवडणुकीत केवळ 80 जागा मिळाल्या होत्या. राज्यात या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Assembly Election : ...म्हणून कार्यकर्त्यांनो, तुम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचला!

शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते. शिवसेनेने 169 जागा लढवून 73 जिंकल्या होत्या, तर 116 जागा लढवणाऱ्या भाजपला 65 मतदारसंघांत विजय मिळाला होता. आता आघाडी आणि युतींचे राजकारण सुरू झाले होते. काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यामुळे कोणताही एखादा पक्ष सर्व 288 जागा लढवण्याची शक्यता संपुष्टात आली होती.

एकापेक्षा अधिक पक्ष एकत्र येऊ लागल्यामुळे त्यांच्या वाट्याला कमी जागा येऊ लागल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची अडचण झाली. काही जणांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. त्यामुळे पक्षांतरांचे प्रमाण वाढले. आपल्या पक्षाला जागा सुटत नसेल तर एेनवेळी अन्य पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याचे प्रकार सुरू झाले.

महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्षांची संख्या आहे 145. राष्ट्रीय पक्षांची संख्या आहे सहा आणि प्रादेशिक पक्षांची संख्या आहे चार. राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता येण्याचा एक काळ होता. उजव्या विचारसरणीच्या मतदरांसाठीची पोकळी शिवसेना, भाजपने भरून काढायला सुरुवात केली आणि कालांतराने काँग्रेसची शक्ती क्षीण होत गेली.

Maharashtra Politics
Srinivas Vanaga : शिंदेंसाठी ठाकरेंची साथ सोडली, तरी दोनदा तिकीट कापलं, उद्विग्न वनगा 15 तासांपासून 'नॉट रिचेबल'

शरद पवार यांचे बाजूला होणे हेही काँग्रेसची शक्ती क्षीण होण्यासाठीचे प्रमुख कारण ठरले. आता तर धार्मिक, सामाजिक ध्रुवीकरणाचा काळ सुरू झालेला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी पाहिल्या. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे तीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन शक्तिशाली प्रदेशिक पक्षांमध्ये फूट पडली.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अजितदादा पवार यांनीही 40 आमदारांसह काका शरद पवार यांची साथ सोडली. पक्षातून फुटून बाहेर पडणाऱ्या आणि पक्षांची फोडाफोडी करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिली. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहे.

अर्थात महाविकास आघाडी आणि महायुतीतही एकाही पक्षाला सर्व 288 जागा लढणे शक्य होणारच नव्हते. वाट्याला आलेल्या जागांसाठी सर्वत पक्षांना उमेदवार आयात करावे लागत आहेत. नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा उद्देश निवडणुका जिंकणे हाच असतो.

त्यामुळे उमेदवार देताना निवडून येणे, हा निकष सर्वोपरी असतो. त्यामुळे काही निष्ठावंत नाराज होत आहेत, मात्र राजकीय पक्षांकडे त्यावर कोणताही पर्याय शिल्लक राहिल्याचे दिसत नाही. युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरू झाल्यामुळे निष्ठावंतांवर असा प्रसंग ओढवत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कक्षा आकसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com