Girish Mahajan  Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan @ Latur : पालकमंत्री असूनही गिरीश महाजन गुपचूप लातुरात; काय आहे कारण?

Lok Sabha Election 2024 : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उदगीर येथे जाहीर सभा घेतली. तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सर्व गटबाजी बाजूला सारून कामाला लागण्याचे आदेशही दिले होते. मात्र येथून काँग्रेसप्रमाणे भाजपची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे.

राम काळगे

Latur Political News : लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सर्वप्रथम दुसऱ्याच यादीत खासदार सुधाकर शृंगारे Sudhakar Shrangare यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप प्रचाराला फारसा वेग आला नाही. त्या उपर काँग्रेसच्या उमेदवारांनी एक फेरी पूर्ण केली आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपचा प्रचार अतिशय संथ गतीने सुरू आहे. हे चित्र लक्षात येताच पालकमंत्री गिरीश महाजन थेट लातूरमध्येच आले. Girish Mahajan In Latur meet BJP Official.

महाजनांचा हा दौरा शुक्रवारी (ता. 12) पार पडला. मात्र त्याबाबत अतिशय गोपनीय ठेवण्यात आला. त्यामुळे भाजपत नेमके कोणत्या विषयांवर खलबते सुरू आहे, याची चर्चा सुरू आहे. भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांच्या भेटीही स्वतंत्र घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील भाजपअंतर्गत गटबाजीत शृंगारे नेमके कोणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता प्रचाराची राळ उडणार असली तरी जिल्ह्यातील कोणत्याही अंतर्गत गटबाजीत न पडता विजय मिळविण्यासाठी खासदार शृंगारे यांनी सध्या तरी 'नरोवा.... कुंजरोवा...' अशी भूमिका घेतली आहे.

लातूरसाठी भाजपकडून शृंगारे, तर काँग्रेसकडून डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे Shivajirao Kalge यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाजी काळगे हे प्रोफेसनल व नवी कोरी पाटी असल्याने व्यापारी प्रतिष्ठित लोकांकडून अधिक पसंती येत आहे. त्यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा, शिरूरअनंतपाळ व देवणी यासह लातूर मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे शृंगारेंना उमेवारी मिळाल्यानंतर सर्वांनाच अश्चर्य व्यक्त केले. त्यांची निष्क्रीयता लपवून राहिलेली नाही. त्यामुळेच लातूरमध्ये Latur भाजपची कार्यकर्ते व प्रचार यंत्रणा थंडच आहेत. मागील निवडणुकीतील सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे होती. आता या निवडणुकीतही त्यांच्याकडे संयोजक पद देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळेंनी Chandrashekhar Bawankule उदगीर येथे जाहीर सभा घेतली. तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सर्व गटबाजी बाजूला सारून कामाला लागण्याचे आदेशही दिले होते. मात्र, येथून काँग्रेसप्रमाणे भाजपची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे.

सध्या खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन लातूरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी दिवसभर महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या भेटीगाठी अतिशय गोपनीय ठेवण्यात आल्या असून, महाजनांचा हा दौरा नेमक्या कोणत्या कारणासाठी होता, हे स्पष्ट झाले नाही. मात्र महाजनांच्या येण्याने उमेदवार बदलणार, की अंतर्गत मिटवून सर्वांना लातूरसाठी कामाला लावणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. लातूरमध्ये शिवाजी काळगेंनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी शृंगारे अंतर्गत गटबाजीचे चक्रव्यूह कसे भेदणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT