Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय असा सामना होत आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पावर Sharad Pawar यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कसून कामाला लागले आहेत. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने बारामती मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. त्यातच पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या टिप्पणीवरून आमदार रोहित पवारांनी अजितदादांना ओपन चॅलेंज दिले आहे. Rohit Pawar attack on Ajit Pawar.
बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. गावोगावच्या सभांतून कुणी काय केले, याची उणीदुणी काढली जात आहेत. यातूनच अजित पवार Ajit Pawar यांनी पवार कुटुंबातील सदस्यांबाबत एक विधान केले होते. यापूर्वीच्या निवडणुकांत माझी भावंडे कधीच माझ्यासाठी प्रचाराला उतरली नाहीत. आता मात्र ते पायात भिंगरी बांधल्यासारखी ते बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगवल्यावाणी हे सर्व लोक उगवले आहेत. मात्र त्यांच्याबद्दल तोंड उघडले तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशाराच अजितदादांनी दिला होता.
अजित पवारांच्या या टीकेला आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar इंदापूर येथील एका सभेत शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले आहे. अजितदादांनी काय बोलायचे ते एकदाच बोलून टाकावे. तुम्ही तुमच्या भावंडाबद्दल माणसांत येऊन सांगा, मग तुमची भावंडेही तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतील, असे ओपन चॅलेंजच रोहित पवारांनी अजित पवारांना दिले आहे.
अजित पवारांनी केलेल्या या टीकेला ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले होते. यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुकांत आमचे कुटुंब अजित, सुप्रिया, रोहित आणि माझ्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. आमचे कुटुंब शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी चुकीचे काहीही केले नाही, त्यांनी तोंड उघडले तरी काही होणार नाही, असे पवार म्हणाले होते.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.