BJP MLA Gopichand Padalkar addressing the Hindu Jan Aakrosh Morcha in Beed; his remark urging Hindu girls to skip gyms and practise yoga at home has drawn sharp public debate. Sarkarnama
मराठवाडा

Gopichand Padalkar : '...म्हणून हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये'; गोपीचंद पडळकरांचा अजब सल्ला, वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच

Gopichand Padalkar Yoga Advice to Hindu Girls : मागील अनेक दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. शिवाय ते कधी मुस्लिम तर कधी ख्रिश्चन समाजाला टार्गेट करतात.

Jagdish Patil

Beed News, 17 Oct : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडमधील हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना हिंदू मुलींना एक अजब सल्ला दिला आहे. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात. त्यामुळे त्यांनी जिमला जाऊच नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

शिवाय ते कधी मुस्लिम तर कधी ख्रिश्चन समाजाला टार्गेट करतात. त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांना राज्याचे मुख्यमंत्री आवरणार आहेत की नाही? असा प्रश्न विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अशातच आता त्यांनी थेट हिंदू मुलींनी जिमला न जाता घरातच योगा करण्याचा सल्ला दिला आहे. बीड जिल्ह्यातीलहिंदू जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना पडळकर म्हणाले, 'जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. आपल्या जर तरूण मुली जिममध्ये जात असतील तर त्यांना सांगा घरात योगा करा. कारण हे किती मोठे षड्‍यंत्र आहे हे तुम्हाला माहिती नाही.

शिवाय या परिसरातील कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याच पुरूषाला युवकाला प्रवेश दिला नाही पाहिजे. कॉलेजबाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांना मारून काढा. माझी आपल्या पोरींना विनंती आहे तुमच्या पाया पडतो. हे इतकं मोठं षढयंत्र आहे हे समजून घ्या', असं पडळकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT