Ganesh Naik Controversy : गणेश नाईक स्वत:च्याच वक्तव्यामुळे अडचणीत; शिंदेसेनेने अचूक टाईमिंग साधलं, मंत्रिपद घालवण्यासाठी न्यायालयात जाणार

Maharashtra Forest Minister: भाजपचे नवी मुंबईतील नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. तर याच संधीचा फायदा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना नाईक यांचं मंत्रिपद घालवण्याच्या तयारीत आहे.
Eknath Shinde, Ganesh Naik
Eknath Shinde, Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai, 17 Oct : भाजपचे नवी मुंबईतील नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. तर याच संधीचा फायदा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना नाईक यांचं मंत्रिपद घालवण्याच्या तयारीत आहे.

मंत्री गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद सर्वश्रुत आहे. नाईक आणि शिंदे दोन्ही नेते महायुतीत मंत्री असले तरी त्यांच्यातील धुसफूस सतत बाहेर येत असते. मंत्री नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदेंची पॉवर कमी करण्यासाठी प्लॅन केल्याचा आरोप केला जातो.

अशातच आता मंत्री गणेश नाईक वादात अडकल्याचा फायदा शिंदेंच्या शिवसेनेकडून घेतला जाणार असल्याचं समोर आलं आहे. कारण नवी मुंबई वाशी येथील एका संस्थेच्या मेळाव्यात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी, 'माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिले होती. पण मी वनमंत्री झाल्यावर त्या पिलांना मी सोडून दिलं, असे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळेच ते अडचणीत सापडले आहेत.

Eknath Shinde, Ganesh Naik
Santosh Khandekar : जालना महापालिका आयुक्तांना अटक; 10 लाखांची लाच घेताना ACB रंगेहाथ उचललं

ते म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी एकजण हरिण घेऊन आले होते. त्यावेळी मी त्या हरीणला सांभाळले होते. परंतू, ज्यावेळी मी वनमंत्री झालो तेव्हा मी त्याला सोडून दिलं. कारण वनमंत्री झाल्यानंतर जंगलातले प्राणी पाळणे शक्य नाही. शिवाय मी बिबट्याची पिल्ले सुद्धा पाळली होती. परंतू, या प्राण्यांना कोण सांभाळणार? आपण प्रेमाने सांभाळू परंतू, कायद्यानुसार जंगलातले प्राणी पाळणे हा गुन्हा आहे.'

Eknath Shinde, Ganesh Naik
BJP Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंना घेरलं!

नाईकांविरोधात शिंदेसेना न्यायालायत जाणार

दरम्यान, मंत्री नाईक यांनी वन्यप्राणी पाळल्याची कबुली दिल्यानंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना नाईक यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. वन्यजीव पाळणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत शिंदेसेना न्यायलयात धाव घेणार आहे. त्यामुळे नाईकांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता असून त्यासाठी शिवसेनेने प्लॅन केल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com