Gopichand Padalkar-Ajit Pawar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Gopichand Padalkar Vs Ajit Pawar: इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती..

Marathwada News: भुजबळ म्हणतात बिहार प्रमाणे ओबीसी जनगणना करा, पण बिहारने निर्णय घेतला तेव्हा तुम्ही मंत्री होता.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News: माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन उत्तर देईन. जिथे इंदिरा गांधीचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती, अशा शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना आव्हान दिले. (Aurangabad)औरंगाबाद येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या कार्यक्रमासाठी आले असतांना ते माध्यमांशी बोलत होते. पडळकर यांनी ओबीसी जनगणना विषयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली.

पडळकर म्हणाले, (Ncp) राष्ट्रवादी काॅंग्रेसचा चेहरा उघड करण्याचे काम आणि माझे कर्तव्य आहे, ते मी करत आहे. धनगर, ओबीसी समाजाला न्याय मिळू नये हीच राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची भूमिका राहिलेली आहे. (Ajit Pawar) भुजबळ म्हणतात बिहार प्रमाणे ओबीसी जनगणना करा, पण बिहारने निर्णय घेतला तेव्हा तुम्ही मंत्री होता. आता सरकार बदलताच मागणी करणे, ही दुटप्पी भूमिका आहे.

तेव्हा माझी औकात काढण्याऱ्यांनी आधी यावर उत्तर द्यावे. जनगणना करायला माझा विरोध नाही. मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन. मंत्रीमंडळ विस्तारा संदर्भात विचारले असता, मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार माझा नाही, तो कधी होईल, कुणाला घेतील हा निर्णय त्यांचा आहे.

धनगर समाजाला त्यात स्थान मिळावे एवढीच माझी अपेक्षा आहे. भाजपने नेहमीच धनगर समाजाला न्याय दिला आहे. अहमदनगरचे नामांतर पूण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा, एवढीच माझी मागणी आहे, यावरून लगेच मी नगर लोकसभा लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या, त्यात काही तथ्य नाही, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT